शहरं
Join us  
Trending Stories
1
६ डिसेंबरला करायचा होता स्फोट, पण अटकसत्रामुळे उधळला कट, ‘कार बॉम्ब’ची सुरू होती तयारी, नेटवरून घेतले धडे
2
आजचे राशीभविष्य,१३ नोव्हेंबर २०२५: कामाच्या धावपळीत कुटुंबाकडे दुर्लक्ष; सरकारकडून लाभाची शक्यता
3
लग्न होत नाहीये, पत्नी मिळवून द्या! तुमचे उपकार विसरणार नाही! अकाेल्यातील तरुणाचे थेट शरद पवारांना साकडे
4
दहशतवाद्यांनी जानेवारीत केली होती लाल किल्ला भागात रेकी, टॉवर लोकेशन डेटाद्वारे करण्यात आली खात्री
5
भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे केंद्र ठरलेले लंडनमधील ‘इंडिया हाऊस’ आता महाराष्ट्र सरकार करणार खरेदी
6
५०० वर्षांनी गुरु-शनिचा शुभ योग: १० राशींना चौफेर चौपट लाभ, समस्या संपतील; पद-पैसा-भाग्योदय!
7
Datta Jayanti 2025: यंदा दत्त जयंती गुरुवारी, अत्यंत शुभ दिवस; पाहा, महत्त्व अन् महात्म्य!
8
तेजस्वीची राजद घेईल सर्वाधिक जागा, पण सत्ता एनडीएचीच, 'ॲक्सिस माय इंडिया' एक्झिट पोलमध्ये अंदाज  
9
त्या दहशतवादी महिला डॉक्टरचा माजी पती म्हणतो... ती प्रेमळ आई
10
काश्मीरमध्ये तीन दिवसांत तब्बल १५०० जण ताब्यात, कुलगाम-सोपोरसह शेकडो ठिकाणी छापे, झडती तीव्र
11
एमसीएच्या निवडणुकीमध्ये आ. जितेंद्र आव्हाड यांची बाजी, उपाध्यक्षपदी १३६ मतांनी विजय; अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड
12
‘ओंकार’ जाणार वनतारामध्ये, सर्किट बेंचचा निर्णय, मूळ याचिका कायम
13
तुर्कीयेचे लष्करी मालवाहतूक विमान कोसळले; २० ठार
14
रोहित शर्मा ७ वर्षांनंतर खेळणार विजय हजारे करंडक, विराटबाबत संभ्रम
15
जुरेल घेणार रेड्डीचे स्थान, पहिल्या कसोटीत ऋषभ पंतही खेळणार, अक्षर पटेलला अंतिम संघात संधी
16
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
17
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
18
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
19
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
20
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा

कर्जमाफीनंतरही शेतकरी आत्महत्या थांबेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 11:51 IST

गत १९ वर्षात जिल्ह्यात चार हजार ३२६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. राज्य शासनाने कर्जमाफी केल्यवरही शेतकरी आत्महत्या थांबल्या नाही. गेल्या तीन वर्षात जिल्ह्यात ६१३ शेतकरी आत्महत्येची नोंद शासन दप्तरी करण्यात आली.

ठळक मुद्देतीन वर्षात ६१३ आत्महत्या १९ वर्षांत चार हजार ३२६ आत्महत्यांची नोंद

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गत १९ वर्षात जिल्ह्यात चार हजार ३२६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. राज्य शासनाने कर्जमाफी केल्यवरही शेतकरी आत्महत्या थांबल्या नाही. गेल्या तीन वर्षात जिल्ह्यात ६१३ शेतकरी आत्महत्येची नोंद शासन दप्तरी करण्यात आली.शेतकरी आत्महत्येची ८० कारणे समाजकार्य महाविद्यालयाच्या सर्वेक्षणातून पुढे आली. यात कर्जबाजारीपणा हे प्रमुख कारण आहे. आर्थिक विवंचनेतून बाहेर पडण्यासाठी शेतकऱ्यांना खर्चावर आधारीत दर देण्यात यावे, अशी शिफारस स्वामिनाथन आयोगानेही केली. या शिफारशीची अंमलबजावणी झाली नाही. आघाडी सरकारच्या काळात २००७ मध्ये केंद्र शासनाने आणि २००८ मध्ये राज्य शासनाने कर्जमाफी केली होती. युती शासनाने २०१७ मध्ये कर्जमाफी केली. या तीनही कर्जमाफीच्या उपाययोजना कुचकामी ठरल्या. शेतकरी आत्महत्या सतत सुरूच आहे. दर वाढीची मुख्य उपाययोजना न झाल्याने आत्महत्या कायम असल्याचे मत शेतकरी अभ्यासक नोंदवित आहे.२००० ते २०१९ या १९ वर्षांमध्ये यवतमाळ जिल्ह्यात ४ हजार ३२६ शेतकरी आत्महत्यांची नोंद झाली. यातील १७०९ शेतकरी आत्महत्या मदतीस पात्र ठरल्या. तर २५७५ अपात्र ठरल्या. तर ४२ प्रकरणे चौकशीत आहेत. २०१७ मध्ये युती शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतक री सन्मान योजनेतून दीड लाखापर्यंत कर्जमाफी केली. यानंतरही जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या थांबल्या नाही. कर्जमाफीच्या घोषणेच्या काळात २४२ आत्महत्याची नोंद शासन दरबारी झाली आहे. २०१८ मध्ये २५५ शेतकरी आत्महत्या झाल्या. २०१९ मध्ये जुलैपर्यंत ११६ आत्महत्या झाल्या. युती शासन काळातील कर्जमाफी नंतरच्या तीन वर्षात ६१३ आत्महत्यांची नोंद झाली आहे. यामधील १६८ आत्महत्या मदतीस पात्र ठरल्या आहेत. तर ४०३ आत्महत्या मदतीस अपात्र ठरल्या आहेत. तर ४२ आत्महत्या चौकशीत आहे.खर्चावर आधारीत दरच नाहीशेतमालास खर्चावर आधारीत दर मिळत नाही. लागवड खर्च अधिक ५० टक्के नफ्यासह भाव दिला तरच शेतकऱ्यांची स्थिती सुधारणार आहे. यासोबतच शासकीय हमी केंद्राची संख्या वाढवावी लागणार आहे. शेती कसण्यासाठी मुबलक कर्ज, खत, बियाणे आणि औषधांवर अनुदानासह मजुरीसाठी रोजगार हमीतून मदत हवी आहे. ठोस उपाययोजनासह धोरणात्मक निर्णयाची गरज आहे.सरसकट कर्ज माफ करादुष्काळी स्थितीने अनेक शेतकरी कर्जाच्या खाईत अडकले आहे. काही शेतकºयांकडे दीड लाखापेक्षा जास्त कर्ज आहे. काही शेतकरी ‘डेडलाईन’ने अडचणीत सापडले आहेत. यामुळे कर्जमाफीची व्याप्ती वाढवून सरसकट कर्ज माफी करण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्या