शहरं
Join us  
Trending Stories
1
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
2
'आधी १९७१ चा प्रश्न सोडवा, मग आपण चर्चा करू', बांगलादेशच्या भूमीवर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा अपमान
3
बायकोला जाळणाऱ्या नवऱ्याचा एन्काउंटर; पायाला लागली गोळी, पळून जाण्याचा करत होता प्रयत्न
4
समुद्रात भारताची ताकद वाढणार, जर्मनीसोबत ७० हजार कोटींचा करार; ६ हाय-टेक पाणबुड्या बांधणार
5
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
6
युक्रेनमध्ये हाहाकार, रशियानं 143 ठिकाणांवर केली  बॉम्बिंग; डोनेत्स्कमध्ये दोन गावांवर कब्जा!
7
"हुंड्यात स्कॉर्पिओ, बुलेट दिली तरी माझ्या मुलीची हत्या, आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवा अन्यथा..."
8
एआयची कमाल, 25 वर्षांनंतर परतला महिलेचा आवाज...! कसा घडला हा चमत्कार? जाणून थक्क व्हाल!
9
लग्नाला ८ वर्षं होऊनही मुलबाळ नाही, तांत्रिक महिलेला म्हणाला तंत्रमंत्राने गर्भधारणा करतो, त्यानंतर...
10
फलकावरुन झालेल्या वादातून दगडफेक; कोल्हापुरात दोन्ही गटांतील ४०० जणांवर दंगलीचा गुन्हा, लाखोंचे नुकसान
11
राहुल द्रविडनंतर तोच! चेतेश्वर पुजाराच्या टॉप-५ रेकॉर्ड ब्रेक इनिंग
12
Mahindra च्या नवीन SUV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; फक्त अडीच मिनिटांत बुक झाला स्टॉक
13
अरे देवा! मृताच्या कुटुंबाला ६ लाखांची मदत जाहीर; ६ महिला म्हणतात, "मीच यांची खरी बायको..."
14
'अमेरिका रशियन तेल खरेदीची परवानगी देतो; हा ढोंगीपणा...' भारतीय कंपन्यांनी केली पोलखोल
15
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
16
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
17
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
18
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
19
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
20
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका

शेतकऱ्यांच्या संपाला व्यापाऱ्यांची साथ

By admin | Updated: June 6, 2017 01:25 IST

संपूर्ण कर्जमाफी आणि स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्या या व इतर मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाला व्यापाऱ्यांनीही साथ दिली.

आर्णीत टायर जाळून रोखला रस्ता : नेरमध्ये संपूर्ण बाजारपेठ बंद, बाभूळगाव तहसीलदारांना निवेदन, राळेगावातही संताप व्यक्तलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : संपूर्ण कर्जमाफी आणि स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्या या व इतर मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाला व्यापाऱ्यांनीही साथ दिली. नेर, बाभूळगाव, कळंब, राळेगाव, आर्णी येथील संपूर्ण बाजारपेठ दिवसभर बंद होती. नेरमध्ये बंद कडकडीतनेर : ‘मी संपावर जातोय’ या शेतकरी आंदोलनाला शहरातील व्यापाऱ्यांनी प्रतिसाद देत आपली प्रतिष्ठाने बंद ठेवली. सर्व दुकाने दिवसभर कडकडीत बंद होती. दरम्यान, युवा शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने रॅली काढण्यात आली. या माध्यमातून व्यापाऱ्यांना बंदचे आवाहन करण्यात आले होते. रॅलीमध्ये शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विनायक भेंडे, गोपाल चव्हाण, संतोष अरसोड, निखिल जैत, उमेश गोळे, सतीश चव्हाण, गौरव नाईकर, हिम्मत देशमुख, सदानंद पेचे, सदाशिव गावंडे, पंजाबराव खोडके, शिवसेनेचे उमेश गोळे, प्रशांत मासाळ, राष्ट्रवादीचे सुनील खाडे यांच्यासह शेतकऱ्यांचा रॅलीमध्ये सहभाग होता.बाभूळगाव तहसीलवर मोर्चाबाभूळगाव : सरसकट कर्जमाफी मिळावी, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू कराव्या यासह विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावर मोर्चा नेऊन तहसीलदार दिलीप झाडे यांना निवेदन सादर केले. शेतकरी संघर्ष समितीतर्फे काढण्यात आलेल्या या मोर्चात शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शासनाच्या निषेधाच्या घोषणा देत मोर्चा शहरातील प्रमुख मार्गाने तहसील कार्यालयावर धडकला. तहसीलदारांनी मोर्चेकऱ्यांचे निवेदन स्वीकारले. यावेळी पोलीस निरीक्षक अनिल पाटील उपस्थित होते. यानंतर आंदोलनकर्त्यांनी रस्त्यावर दूध ओतून मुख्यमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. त्यानंतर झालेल्या सभेत अनेकांची भाषणे झाली. दरम्यान, शहरातील संपूर्ण बाजारपेठ कडकडीत बंद होती.आंदोलनात जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोकराव घारफळकर, भैयासाहेब देशमुख, नरेंद्र कोंबे, डॉ. रमेश महापूर, नरेंद्र देशमुख, प्रकाशचंद तातेड, प्रवीण खेवले, नाना खांदवे, श्रीकांत कापसे, मुकेश देशमुख, अ‍ॅड. राजेंद्र कडुकार, अ‍ॅड. रणजित रंगारी, वसंत जाधव, लक्ष्मणराव आखरे, प्रभाकरराव गायकवाड, गजानन नाईकवाड, गजानन पांडे, बाबू पांडे, कृष्णा ढाले, विजय गोडे, आशीष सोळंकी, बल्लू जगताप, योगेश्वर मिश्रा, नंदू अडेकर, महादेव नेरकर, रमेश मोते, सुधीर कडुकार, भानुदास राऊत, उत्तम पाटील, यमूताई रूमाले, भानुदास ढोकणे, दीपक बरडे, प्रशांत वानखडे आदी सहभागी झाले होते. जवळा येथे बंद यशस्वीजवळा : शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांना घेवून आर्णी तालुक्यातील जवळा येथे बंद पाळण्यात आला. संपूर्ण बाजारपेठ बंद होती. या आंदोलनामध्ये रवी वंडे, तैयब खान, गणेश मोरे, वसराम जाधव, दिलीप नागपुरे, शेख रऊफ, बंडू नाकतोडे, शरद पुसदकर, पुष्कराज महल्ले, संदीप ढाकुलकार, गणेश दुर्गे, अशोक राऊत, संजय सुखदेव, सुभाष बांगर, बाबाराव खोडनकर, भारत कालबंडे, लक्ष्मणराव कोरटकर आदी सहभागी झाले होते.आर्णी येथे रास्ता रोकोआर्णी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे येथे रास्ता रोको करण्यात आला. मेन रोडवर टायर जाळण्यात आले. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी व शेतमालाला योग्य भाव मिळावा यासाठी हे आंदोलन करण्यात आले. मोर्चाला पाठिंबा देत शहरातील व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवण्यात आली होती. या आंदोलनामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे सचिन येलगंधेवार, विशाल देशमुख, राहुल ढोरे, अतुल मुनगीनवार, शनी आडे, पवार आदी सहभागी झाले होते. राळेगावात भाजीपाला व दूध रस्त्यावर फेकलेराळेगाव : शेतकऱ्यांच्या बंदला शहरात चांगला प्रतिसाद मिळाला. संपूर्ण बाजारपेठ बंद होती. भाजीपाला आणि दूध रस्त्यावर फेकून शेतकऱ्यांनी शासनाप्रती आपला संताप व्यक्त केला. यवतमाळ मार्गावर असलेल्या जिनिंग प्रेसिंग चौकात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे धरणे देण्यात आले. २७ आंदोलकांना स्थानबध्द करण्यात आले. विविध घोषणा, नारे देऊन परिसर दणाणून सोडला.यावेळी अरविंद वाढोणकर, जानराव गिरी, अ‍ॅड.फिडेल बायदानी, अ‍ॅड.सीमा तेलंगे आदींची भाषणे झाली. नीलेश रोठे, सुरेश खुडसंगे, वसंत पोटफोडे, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद फुटाणे, नगरसेवक अप्सर अली, गजानन पाल, वसीम पठाण आदी २७ जणांना स्थानबद्ध करण्यात आले होते. कळंब तहसीलदारांना निवेदनकळंब : शेतकऱ्यांचा सातबारा सरसकट कोरा करा, स्वामीनाथन आयोग लागू करा, शेतमालाला उत्पादनावर आधारित भाव आदी मागण्यांसाठी शहर बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दुपारी शेतकरी संघर्ष समितीतर्फे तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले. शहरातील भाजी मार्केटसह संपूर्ण बाजारपेठ बंद होती. बसस्थानक ते तहसीलपर्यंत मोर्चा नेण्यात आला. शेतकरी संघर्ष समितीतर्फे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यावेळी पंचायत समिती उपसभापती महादेव काळे, बाजार समितीचे संचालक योगेश धांदे, नगरसेवक राजू पड्डा, मुश्ताक शेख, अशोक उमरतकर, मधुकर गोहणे, अभी पांडे, सुधाकर झोटिंग, दिलीप नेहारे, ओमप्रकाश आचार्य, विजय बुरबुरे, मारोती वानखडे, सिध्देश्वर वाघमारे, प्रशांत महाजन, रमेश दाभेरे, विजय गेडाम, राजेश भोयर, मनिष चरडे, मधुकर लिल्लारे आदी उपस्थित होते.