तीन अस्वलांनी केलेल्या हल्ल्यात शेतकरी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2019 11:38 IST2019-10-29T11:38:37+5:302019-10-29T11:38:57+5:30

नांदगाव शिवारात असलेल्या बेलारी येथे मंगळवारी सकाळी ८ च्या सुमारास शेतात गेलेल्या शेतकऱ्यावर तीन अस्वलांनी जोरदार हल्ला चढवून त्याला जखमी केले.

Farmers injured in attack by three bears | तीन अस्वलांनी केलेल्या हल्ल्यात शेतकरी जखमी

तीन अस्वलांनी केलेल्या हल्ल्यात शेतकरी जखमी

नरेंद्र नापते
कुत्र्यांनी वाचवला त्याचा जीव
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ: नांदगाव शिवारात असलेल्या बेलारी येथे मंगळवारी सकाळी ८ च्या सुमारास शेतात गेलेल्या शेतकऱ्यावर तीन अस्वलांनी जोरदार हल्ला चढवून त्याला जखमी केले. यावेळी त्याला वाचवायला जवळपास कुणीच नव्हते. मात्र तेथे असलेल्या भटक्या कुत्र्यांनी अस्वलांवर भुंकून हल्ला चढवला व त्यांना पळवून लावले. सुधाकर भिकूचंद पवार, बेलारी असे या शेतकºयाचे नाव आहे. त्याला उमरखेड येथील रुग्णालयात दाखल केले आहे.
यासंदर्भात नागरिकांनी वनविभागाच्या कार्यालयात फोन लावला असता, सुट्टीवर असल्याचे कारण सांगण्यात आले. या भागात एकदा बिबट्यानेही असाच हल्ला चढवून शेतकऱ्यांच्या पाळीव जनावरांना जखमी केले होते. गावकºयांना वन्यजीवांच्या बंदोबस्ताची मागणी होत आहे.

 

Web Title: Farmers injured in attack by three bears