पाथरीतील शेतकरी आत्महत्या नापिकीनेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 10:32 PM2018-11-21T22:32:51+5:302018-11-21T22:33:22+5:30

केळापूर तालुक्याच्या पाथरी गावातील प्रेमदास ताकसांडे हे शेतकरी नापिकीचेच बळी ठरले आहे. शेतकरी मिशनच्या सत्यशोधन अहवालात हे भीषण वास्तव पुढे आल्याचे शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी म्हटले आहे.

The farmer's farmer committed suicide | पाथरीतील शेतकरी आत्महत्या नापिकीनेच

पाथरीतील शेतकरी आत्महत्या नापिकीनेच

Next
ठळक मुद्देकिशोर तिवारी : सत्यशोधन समितीचा अहवाल पंतप्रधानांना सादर करणार

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : केळापूर तालुक्याच्या पाथरी गावातील प्रेमदास ताकसांडे हे शेतकरी नापिकीचेच बळी ठरले आहे. शेतकरी मिशनच्या सत्यशोधन अहवालात हे भीषण वास्तव पुढे आल्याचे शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी म्हटले आहे.
शेतकऱ्यांचे उत्पन्न विविध कारणांमुळे ३० ते ४० टक्क्यांवर आले आहे. आता वातावरणातील बदल तुरीचे संपूर्ण पीक नष्ट करीत आहे. यात शेतकऱ्यांच्या अडचणीत कमालीची वाढ झाली आहे. अशा कठीण समयी सरकारी अधिकारी व कर्मचारी शेतकऱ्यांना योजनांचा फायदा तर दूर संपर्कही करत नाहीत हे कटूसत्य आहे. १५ नोव्हेंबर रोजी पाथरी येथील प्रेमदास ताकसांडे या शेतकऱ्याने आपली जीवनयात्रा संपविली. किशोर तिवारी यांनी मंगळवारी त्यांच्या घरी भेट दिली. यावेळी पुढे आलेले सत्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सादर करणार असल्याचे किशोर तिवारी यांनी कळविले.
प्रेमदास ताकसांडे यांच्या आत्महत्येनंतर केवळ पटवारी आणि कृषी सहायकांनी त्यांच्या घरी भेट दिली. पीककर्ज माफीचा केवळ १५ हजार रुपये लाभ मिळाला. एकही कृषी योजना मिळाली नाही. रमाई घरकूल योजनेचाही लाभ मिळाला नाही, अशी व्यथा प्रेमदास ताकसांडे यांच्या पत्नी तुळसाबाई यांनी किशोर तिवारी यांच्याकडे या भेटीत मांडली.
दिवसा कधीच वीज राहात नाही. रात्री वाघाची भीती आहे. शेतात जाऊ शकत नसल्याने पाणी असूनही पीक बुडाले. बहुतांश शेतकऱ्यांची हीच परिस्थिती असल्याची माहिती शेतकरी व पाथरीचे सरपंच राजू पेंदोर आणि मोहद्याचे सरपंच विजय तेलंगे यांनी यावेळी दिली. प्रेमदास ताकसांडे हे नापिकीमुळेच विवंचनेत होते. यातूनच त्यांनी आत्महत्या केल्याचे यावेळी स्पष्ट झाल्याचे किशोर तिवारी यांनी म्हटले आहे. शिवाय भ्रष्ट यंत्रणाही शेतकऱ्यांच्या हितासाठी कुठल्याही उपाययोजना करत नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.

Web Title: The farmer's farmer committed suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.