मारेगावात शेतकऱ्यांची दारोदारी भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 05:00 IST2020-04-13T05:00:00+5:302020-04-13T05:00:32+5:30

कोरोनाचे संकट कोसळल्याने १७ मार्चपासून सर्वत्र लॉकडाऊन झाले. त्यामुळे शेतातील भाजीपाला एक महिन्यापासून शेतातच पडून आहे. १४ एप्रिलनंतर लॉकडाऊन उठण्याची शेतकऱ्यांना अपेक्षा होती. परंतु कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता लॉकडाऊन आणखी दोन आठवडे वाढविण्यात आले आहे आणि पुढे काय परिस्थिती राहील, हे आज कोणी सांगू शकत नाही.

Farmers door to door in Maregaon | मारेगावात शेतकऱ्यांची दारोदारी भटकंती

मारेगावात शेतकऱ्यांची दारोदारी भटकंती

ठळक मुद्देशेतमालाचेही नुकसान : कवडीमोल भावात केली जातेयं भाजीपाल्याची विक्री

लोकमत न्यूज नेटवर्क
मारेगाव : कोरोनामुळे बाजारपेठा बंद असल्याने घरोघरी जाऊन शेतमाल विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. त्यांना कवडीमोल भावात आपला शेतमाल विकावा लागत आहे.
लॉकडाऊन असल्याने सर्व बाजारपेठा बंद आहे. उन्हाळ्यात भाजीपाला, टरबूज, डांगुर आदी पिकांना मिळणारा दर पाहता या पिकांची तालुक्यात मोठ्या प्रमाणात लागवड होत असते. परंतु अचानक कोरोनाचे संकट कोसळल्याने १७ मार्चपासून सर्वत्र लॉकडाऊन झाले. त्यामुळे शेतातील भाजीपाला एक महिन्यापासून शेतातच पडून आहे. १४ एप्रिलनंतर लॉकडाऊन उठण्याची शेतकऱ्यांना अपेक्षा होती. परंतु कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता लॉकडाऊन आणखी दोन आठवडे वाढविण्यात आले आहे आणि पुढे काय परिस्थिती राहील, हे आज कोणी सांगू शकत नाही. भाजीपाला पिकाची होत चाललेली दैना अवस्था पाहता आता थेट शेतकरी आॅटोने नागरिकांच्या घरोघरी जाऊन कवडीमोल दरात भाजीपाल्याची विक्री करित आहे. यात पालक, टमाटे, वांगे, चवळी, कांदे, कोथिंबीर आदी भाजीपाल्यांचा समावेश आहे.
तर दुसरीकडे तुर, हरभरा, गहू, ज्वारी, मुंग, आदी पिके बाजारपेठ बंद असल्याने शेतकऱ्यांच्याच घरात पडून आहे. त्यामुळे शेतकरी कोंडीत सापडला आहे. शेतकऱ्यांनी आता कडधान्य ही नागरिकांच्या घरी नेऊन थेट विक्री सुरू केली आहे. याठिकाणीसुद्धा शेतकऱ्यांना कमी दरात ही कडधान्य विकावे लागत आहे. शेतकऱ्यांचे होणारे आर्थिक नुकसान पाहता शेतकऱ्यांकडील शेतमाल विक्रीची व्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे.

कृषी विभागाच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपचा आधार
कृषी विभागाने शेतकºयांचे अनेक व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप शेती सल्ला देण्यासाठी बनविले आहे. आता याच ग्रुपचा वापर शेतकºयांना माल विक्रीसाठी फायदेशीर ठरत आहे. अनेक शेतकऱ्यांकडे कांदा, भाजीपाला, गहू, ज्वारी, हरभरा, मिरची आदी वस्तू विकायच्या आहे. हे शेतकरी ग्रुपवर जो माल विकायचा असेल त्याचा फोटो आणि किमंत टाकतात आणि त्याच ग्रुपवर मालाची आर्डर घेऊन घरपोच माल पोहोचवित आहे.

Web Title: Farmers door to door in Maregaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.