वीज कोसळून शेतकऱ्याचा मृत्यू, कारेगाव शिवारातील घटना
By संतोष.अरुण.सूर्यवंशी | Updated: September 28, 2022 20:33 IST2022-09-28T20:32:10+5:302022-09-28T20:33:34+5:30
संतोष कुंडकर वणी ( यवतमाळ ) : शेतात बैल चारण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याच्या अंगावर वीज पडली. यात तो जागीच ठार ...

वीज कोसळून शेतकऱ्याचा मृत्यू, कारेगाव शिवारातील घटना
संतोष कुंडकर
वणी (यवतमाळ) : शेतात बैल चारण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याच्या अंगावर वीज पडली. यात तो जागीच ठार झाला. ही दुर्घटना बुधवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास तालुक्यातील कारेगाव शेतशिवारात घडली.
लखू रामू धुर्वे (४०) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. तो बुधवारी दुपारी बैल चारण्यासाठी शेतात गेला होता. अचानक आभाळ भरून आले आणि विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरूवात झाली. याचवेळी अचानक त्याच्या अंगावर वीज कोसळली. त्यात तो जागीच ठार झाला. त्याच्या मागे पत्नी, मुलगा व बराच मोठा परिवार आहे.