शहरं
Join us  
Trending Stories
1
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
2
Top Marathi News LIVE Updates: बारामती पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; पश्चिम बंगाल, तामिळनाडूतही मतदारराजा देणार कौल
3
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
4
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
5
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
6
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
7
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
8
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
9
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
10
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
11
महिला क्रिकेटरचा 'हनीट्रॅप' गेम! व्यावसायिकाला ६३ लाखांना लुटले, मुंबई पोलिसांनी श्रीनगरमधून उचलले
12
"रिद्धी खूप खूश झाली अन्..." राकेश बापटने सांगितली एक्स वाईफची कशी होती प्रतिक्रिया
13
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
14
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
15
‘पंतप्रधान मोदींना लक्ष्य करणे म्हणजे थेट १४० कोटी भारतीयांचा अपमान’, एकनाथ शिंदेंची खर्गेंवर टीका
16
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
17
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
18
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
19
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
20
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
Daily Top 2Weekly Top 5

अपघात विमा योजनेच्या लाभापासून शेतकरी वंचित

By admin | Updated: July 23, 2014 23:51 IST

शेतकऱ्यांसाठी लागू करण्यात आलेल्या वैयक्तिक अपघात विमा योजनेचा तालुक्यासह जिल्ह्यात बट्ट्याबोळ होत आहे. या अपघात विमा योजनेचा जिल्ह्यातील एकाही शेतकऱ्याला लाभ मिळाला

महागाव : शेतकऱ्यांसाठी लागू करण्यात आलेल्या वैयक्तिक अपघात विमा योजनेचा तालुक्यासह जिल्ह्यात बट्ट्याबोळ होत आहे. या अपघात विमा योजनेचा जिल्ह्यातील एकाही शेतकऱ्याला लाभ मिळाला नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. शासनाने स्वत:च्या तिजोरीतून आतपर्यंत कोट्यवधी रुपये विमा कंपन्यांना दिले. परंतु महसूल विभागाच्या उदासीनतेचा फायदा विमा कंपन्यांनी उचलला आहे. शेतकऱ्यांचा नैसर्गिक आपत्ती व अपघातामुळे मृत्यू झाला किंवा कायम अपंगत्व आले तर मदत मिळावी म्हणून शासनाने ही योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील ४ लाख १७ हजार ४०२ शेतकऱ्यांंना अपघात विमा संरक्षण देण्यात आले. मात्र शेतकऱ्यांच्या हितासाठी असलेल्या या योजनेची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात महसूल विभागाला अपयश आले आहे. महसूल विभागाची अनास्था हेरुन विमा कंपन्यांनी या योजनेतून लाभ लाटला आहे. प्रस्ताव सादर केल्यानंतर अनावश्यक त्रुट्या दाखवीत अनेक मृत शेतकऱ्यांना तथा अपघातग्रस्त शेतकऱ्यांना या योजनेच्या लाभापासून वंचित ठेवण्यात आले आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीची जबाबदारी कृषी विभागावर सोपविली गेली आहे. परंतु महसूल आणि कृषी विभाग या योजनेविषयी पाहिजे तसा सजग नाही. त्यामुळे विमा कंपन्यांनी स्वत:चे उखळ पांढरे केले आहे. जिल्ह्यात वर्षभरात जवळपास एक हजार शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू झाला. अनेक शेतकऱ्यांचे कुटुंब उघड्यावर आले आहे. या शेतकऱ्यांच्या विमा दाव्याचे प्रकरण कंपनीकडे सादर केले. मात्र या प्रस्तावांची दखल घेतली नाही. १५ आॅगस्ट २००७ पासून आतापर्यंत शेकडो प्रकरणे दाखल करण्यात आली. मात्र अनेक प्रकरणे नामंजूर झाली आहे. अमरावती विभागात या योजनेसाठी शासनाने न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीसोबत करार केला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील ४ लाख १७ हजार ४०२ शेतकऱ्यांचा विमा उतरविण्यात आला होता. मात्र या योजनेतील गौडबंगालामुळे पात्र शेतकरी कुटुंब विम्यापासून वंचित आहे. अनेक लाभार्थ्यांनी पीक विम्यासाठी प्रस्ताव दाखल केले. विविध कागदपत्र गोळा केली. मात्र विमा कंपनीच्या हेकेखोर धोरणामुळे या लाभार्थ्यांना लाभच मिळत नाही. कोट्यवधी रुपयांचा हप्ता घेतल्यानंतरही विमा कंपन्या या शेतकऱ्यांना विविध कारणे सांगून लाभापासून वंचित ठेवत आहे. (तालुका प्रतिनिधी)