शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

अतिवृष्टीने त्रस्त शेतकऱ्यांना नोंदीसाठी मागितली लाच, तलाठी अडकला जाळ्यात

By सुरेंद्र राऊत | Updated: August 29, 2022 22:21 IST

गणेश सदाशिव मोळके (४३) असे आरोपी तलाठ्याचे नाव आहे. त्याने धनज येथील शेतकऱ्यांना अतिवृष्टीच्या मदतीसाठी यादीमध्ये नाव नोंदविण्याकरिता पैशाची मागणी केली.

यवतमाळ : अतिवृष्टीमुळे खरिपाचा हंगाम उद्ध्वस्त झाला आहे. शासनाकडून मदतीच्या केवळ घोषणा सुरु आहे. तर अतिवृष्टीच्या यादीत नाव नोंदविण्यासाठी शेतकऱ्यांना पैसे मोजावे लागत आहे. हा धक्कादायक प्रकार उमरखेड तालुक्यातील धनज येथे उघडकीस आला. प्रती शेतकरी ३०० रुपये प्रमाणे लाच मागणाऱ्या तलाठ्याला एसीबीच्या पथकाने सोमवारी रंगेहात पकडले. लाचेची रक्कम स्वीकारण्यासाठी या तलाठ्याने उमरखेडमधील सीएससी केंद्रातील युवकाचा वापर केला. 

गणेश सदाशिव मोळके (४३) असे आरोपी तलाठ्याचे नाव आहे. त्याने धनज येथील शेतकऱ्यांना अतिवृष्टीच्या मदतीसाठी यादीमध्ये नाव नोंदविण्याकरिता पैशाची मागणी केली. याची तक्रार २३ ऑगस्ट रोजी शेतकऱ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. यावरून २५ ऑगस्ट रोजी एसीबीच्या पथकाने पडताळणी कार्यवाही केली. पंचासमक्ष तलाठी गणेश माेळके याने शेतकऱ्यांना प्रती लाभार्थी ३०० रुपये लाचेची मागणी केली. ही रक्कम उमरखेड शहरातील आसरा काॅम्युटर मल्टीसर्विसेस येथील सौरभ संजय नाथे या खासगी इसमाकडे देण्यास सांगितले. 

ठरलेल्या व्यवहाराप्रमाणे एसीबीचे पथक शेतकऱ्यांना घेवून सौरभ नाथे यांच्याकडे पोहोचले. सौरभने शेतकऱ्यांकडून १५०० रुपये लाच पंचासमक्ष स्वीकारली. दबा धरुन असलेल्या एसीबीच्या पथकाने तत्काळ सौरभ नाथे याला ताब्यात घेतले. त्यानंतर तलाठी गणेश मोकळे यालाही अटक केली. 

ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, अपर अधीक्षक अरुण सावंत, देविदास घेवारे, उपअधीक्षक शैलेष सपकाळ यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर नालट, अब्दुल वसीम, राहुल गेडाम, सचिन भोयर, महेश वाकोडे, राकेश सावसाकडे, उपनिरक्षक सुधाकर कोकेवार यांनी केली.  

शेतकऱ्यांच्या टाळू वरचे लोणी खाण्याचा प्रकार 

यंदा शेतकऱ्यांना निसर्गाने कधी नव्हे अशी चपराक दिली आहे. पावसाने सर्व रेकाॅर्ड मोडित काढले आहे. शेतशिवार अजूनही पाण्याने तुडुंब भरलेले आहेत. घरात खाण्यासाठी दाणा शिल्लक नाही. होती नव्हती ती पुंजी शेतकऱ्यांनी खरीप हंगामात खर्च केली. बॅंकांचे कर्ज डोक्यावर आहे.  

दैनंदिन खर्च कसा भागवावा ही समस्या शेतकऱ्यांपुढे आहे. सरकार केवळ मदतीची घोषणा करीत आहे. अजूनही एक रुपया शेतकऱ्यांना मिळाला नाही. पिकाच्या नुकसानीचे सर्वेक्षण सुरू असल्याचा केवळ देखावा निर्माण केला जात आहे. अडचणीत असलेल्या शेतकऱ्याकडून पैसे उकळण्याचा प्रकार निचपणाचा कहर आहे. शासकीय यंत्रणा टाळू वरचे लोणी खाण्यातही मागे पुढे पाहत नसल्याचे वास्तव आहे. 

टॅग्स :FarmerशेतकरीYavatmalयवतमाळ