धावत्या दुचाकीवर हृदयविकाराचा झटका आल्याने शेतकऱ्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 14:20 IST2020-12-05T14:20:24+5:302020-12-05T14:20:35+5:30
Yavatmal News : सिंदखेड येथून हे दाम्पत्य दुचाकीने नेर येथे येत होते.

धावत्या दुचाकीवर हृदयविकाराचा झटका आल्याने शेतकऱ्याचा मृत्यू
नेर (यवतमाळ) - धावत्या दुचाकीवर हृदयविकाराचा झटका आल्याने शेतकऱ्याचा मृत्यू झाला. तर त्यांची पत्नी जखमी झाली आहे. ही घटना शनिवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास कोलुरा (ता. नेर) वळणाजवळ घडली. बबन भीमराव राठोड (५०) रा.सिंदखेड असे मृताचे नाव आहे. कविता बबन राठोड या जखमी झाल्या.
सिंदखेड येथून हे दाम्पत्य दुचाकीने नेर येथे येत होते. कोलुरा गावाजवळ बबन राठोड यांना छातीत कळा सुरू झाल्या. काही कळायच्या आत ते दुचाकी घेऊन खाली कोसळले. जागीच त्यांचा मृत्यू झाला. बबन राठोड यांचा शेतीसोबतच मंडपचा व्यवसाय आहे. त्यांच्याकडे दीड एकर शेती आहे. आई, पत्नी, मुलगा, तीन मुली व मोठा आप्त परिवार त्यांच्या मागे आहे