ज्येष्ठांचे विविध क्षेत्रांत उत्कृष्ट कार्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:48 AM2021-09-12T04:48:22+5:302021-09-12T04:48:22+5:30

अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक मंडळाचे जिल्हाध्यक्ष बळवंत चिंतावार होते. विलास घोडचर, ठाणेदार सुरेश मस्के, श्रीराम भास्करवार प्रामुख्याने उपस्थित होते. त्यांनी ...

Excellent work of seniors in various fields | ज्येष्ठांचे विविध क्षेत्रांत उत्कृष्ट कार्य

ज्येष्ठांचे विविध क्षेत्रांत उत्कृष्ट कार्य

Next

अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक मंडळाचे जिल्हाध्यक्ष बळवंत चिंतावार होते. विलास घोडचर, ठाणेदार सुरेश मस्के, श्रीराम भास्करवार प्रामुख्याने उपस्थित होते. त्यांनी विचार मांडले. मंडळाच्या कार्याचे कौतुक केले. प्रास्ताविकातून मंडळाचे अध्यक्ष ना.म. जवळकर यांनी कार्याचा आढावा मांडला.

भारत मातेच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी रक्तदाते किशोर घेरवरा, ॲड.अमोल चिरडे, नीलेश वानखडे, गजानन निमकर, सर्पमित्र विनोद वांड्रसवार, कोरोना योद्धा सागर चक्रे, कलावंत पल्लवी हिवरकर आदींचा शाल, श्रीफळ व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. संचालन प्रा.राजेंद्र ठाकूर, शिवाजी खडसे, तर आभार बी.डी. तायडे यांनी मानले. मंडळाचे सचिव साहेबराव कांबळे, ओंकार देशकरी, कृष्णराव अर्धापूरकर, तुकाराम इंगळे आदीसह सदस्यांनी परिश्रम घेतले.

110921\img-20210826-wa0024.jpg

जेष्ठ नागरिक मंडळ वर्धापन दिन कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर

Web Title: Excellent work of seniors in various fields

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.