शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
3
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
4
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
5
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
6
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
7
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
8
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
9
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
11
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
12
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
13
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
14
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
15
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
16
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
17
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
18
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
19
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
20
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!

कधी शाळेच्या बाहेर, कधी कॉलेजच्या आत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 21:15 IST

शिकायचे आहे म्हणून त्याला रोज शाळेकडे जावेच लागते. शिकायला नव्हे विकायला! बुढ्ढी के बाल.. पाण्याचे बुडबुडे उडवणारे खेळणे..

ठळक मुद्देस्पर्धा परीक्षेसाठी संघर्ष : गोड गोड ‘बुढ्ढी के बाल’ मागे कडवट कहाणी

अविनाश साबापुरे।आॅनलाईन लोकमतयवतमाळ : शिकायचे आहे म्हणून त्याला रोज शाळेकडे जावेच लागते. शिकायला नव्हे विकायला! बुढ्ढी के बाल.. पाण्याचे बुडबुडे उडवणारे खेळणे.. फुगे अन् बरेच काही सायकलला अडकवून तो शाळांच्या पुढे फिरतो. कारण रोज सकाळी त्याला कॉलेजमध्ये जायचे आहे. विकायला नव्हे शिकायलाच!बुढ्ढी के बाल... अनेकांच्या बालपणाला घट्ट चिटकलेली ही एक आठवण. काही वर्षांपूर्वी बाबांनी आणून दिलेला हाच खाऊ विकून जगण्याची वेळ अक्षयवर का आली..? कारण परिस्थिती त्याला ‘वर्गाबाहेर’च ठेवणारी आहे.अकोलाबाजारजवळच्या हादगावमधून अक्षय खंदारेची स्टोरी सुरू होते. त्याचे बाबा बजरंग बांगड्या विकायचे. आई मंदा मजुरी करायची. अक्षय आणि रुपेश हे दोन लहानगे पायी चालत जाऊन अकोलाबाजारच्या शाळेत शिकायचे. गरिबी होती पण समाधान होते. अक्षय दहावीत ‘फर्स्ट क्लास’मध्ये आला. अकरावीसाठी यवतमाळच्या अमोलकचंद महाविद्यालयात आला. अन् नशिब रूसले. टीबीच्या आजाराने बाबांना घेरले. काळजीने आई अंथरूणाला खिळली. शिकून मोठ्ठे होण्याचे स्वप्न पाहणाºया अक्षयला अचानकच ‘मोठे’ व्हावे लागले...घर चालविण्यासाठी यवतमाळच्याच एका दुकानात अक्षय नोकर बनला. सकाळी कॉलेज, दिवसभर नोकरी. अभ्यासाला वेळच नाही. शेवटी एका शेजाऱ्याला दया आली. त्याने पाचशे रुपये दिले अन् बुढ्ढी के बाल विकण्याचा सल्ला दिला. नोकरीपेक्षा धंदा बरा म्हणून अक्षय नव्या रोजगाराला लागला. कॉलेजमधून आला की यवतमाळातील विविध नामांकित शाळांपुढे तो विक्री करतो. गावाकडच्या आजारी आईबाबांनाही त्याने यवतमाळातच आणले. आठवडीबाजार परिसरात भाड्याच्या खोलीत आईबाबा आणि लहान भावाला त्याने छत्र दिले. सकाळी बीएच्या वर्गात बसणारा अक्षय दुपारी विविध शाळांच्या गेटबाहेर उभा असतो. चिमुकल्यांना एकेका फुग्यात हवा भरून देताना तो अनेकदा पैसेही घेत नाही. गोड बुढ्ढी के बाल विकताना तो आपल्या मनातले दु:ख कधी झळकूही देत नाही. दोनशे रुपये रोज कमावताना उपचार, उदरनिर्वाह आणि शिक्षण अशा तीन आघाड्यांवर तो संघर्ष करतोय.स्पर्धा परीक्षेचा ‘अभिमन्यू’शाळेपुढे खाऊ विकणारा अक्षय स्पर्धा परीक्षेची तयारी करतोय. मोठ्या पदाची आस नाही पण आयुष्यात ‘सेटल’ होण्याचा अक्षयचा प्रयत्न आहे. स्पर्धा परीक्षेसाठी क्लासेस लावण्याची ऐपत नाही. त्याचा संघर्ष हाच त्याचा गुरू. म्हणून स्वत:च जमेल तसे आणि मिळेल ते पुस्तक तो वाचून काढतोय. मात्र अभ्यासासाठी निवांत वेळ त्याच्याकडे नाही. फिरस्तीच्या धंद्यापेक्षा एखादे दुकान मिळावे, एवढीच त्याची अपेक्षा आहे.