शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
3
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
4
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
5
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
6
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
7
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
8
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
9
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
10
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
11
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
12
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
13
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
14
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
15
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
16
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
17
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
18
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
19
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
20
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
Daily Top 2Weekly Top 5

सचिव येऊनही ग्रामसेवक, तलाठ्यांचा शोध

By admin | Updated: May 27, 2015 02:14 IST

शेतकरी आत्महत्यांबाबत शासन अतिशय गंभीर असून, चक्क मंत्रालयातील सचिवांना उपविभागात नियुक्त करून या कारणांचा शोध घेण्याचे आदेश दिले.

यवतमाळ : शेतकरी आत्महत्यांबाबत शासन अतिशय गंभीर असून, चक्क मंत्रालयातील सचिवांना उपविभागात नियुक्त करून या कारणांचा शोध घेण्याचे आदेश दिले. मात्र ग्रामविकासात महत्वाची भूमिका बजावणारे ग्रामसेवक, कृषीसहाय्यक आणि तलाठी अद्यापही गंभीर दिसत नाही. एकही कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याने शेतकऱ्यांच्या समस्या त्यांना कळतच नाही. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी ग्रामस्तरावरील सर्व कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहणे सक्तीचे करण्याची गरज आहे. ग्रामस्थांचा थेट संपर्क असणारे शासकीय कर्मचारीच त्यांना वेळेत उपलब्ध होत नाही. गावातील ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक, प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी आणि प्राथमिक शाळेतील शिक्षक मुख्यालयी राहत नाही. शासनाने या सर्वच कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्यासाठी घरभाडे भत्ता लागू केला आहे. अनेकांनी खोटे भाडे करार करून घरभाडे भत्याची उचलही केली आहे. प्रशासन अधिकाधिक लोकाभीमुख करण्यासाठी विशेष करून यवतमाळसारख्या आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील जनतेला प्रशासनावर पुन्हा विश्वास निर्माण करण्याकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट मंत्रालयातील सचिवांना उपविभागाची जबाबदारी दिली आहे. जिल्ह्यातील सहा उपविभागासाठी सहा सचिव नियुक्त केले आहे. नुकताच त्यांनी आपल्या मुख्यालयी जाऊन आढावाही घेतला आहे. आज प्रशासनातील मुख्य असलेले विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा कृषी अधीक्षक या सर्व मोठ्या अधिकाऱ्यांना सर्वसामान्य माणसांना भेटणे सहज शक्य आहे. आता तर सचिव दर्जाचे अधिकारी गावात येत आहेत. या अधिकाऱ्यांनी जितक्या चकरा गावात मारल्या इतके वेळा त्या गावातील शासकीय कर्मचारी कधीच उपस्थित राहिलेले नाही. मुख्यालयी राहणे बंधनकारक असूनही या सर्व शासकीय कर्मचाऱ्यांचा कारभार तालुका अथवा जिल्ह्याच्या ठिकाणाहून चालतो. त्यामुळे ग्रामविकासाच्या योजना, महसूलाची कामे, आरोग्य सोयी सुविधा आणि ग्रामीण भागातील शिक्षण यांचा पूरता बोजवारा उडाला आहे. आज गावात ग्रामसेवकाला भेटण्यासाठी ग्रामस्थांनी किमान आठ दिवस चकरा माराव्या लागतात असा अनुभव या संवर्गातील सर्वच कर्मचाऱ्यांबाबतचा आहे. ग्रामविकासासाठी शासकीय कर्मचाऱ्याला मुख्यालयी राहणे बंधनकारक करणे आवश्यक आहे. यातून गावातील समस्या निकाली निघतील. शिवाय कर्मचारी वर्ग गावात वास्तव्यास असल्याने एका नवीन संस्कृतीचा उदय गावात होईल. त्या दृष्टिकोनातून कठोर प्रयत्न करणे गरजेचे आहे. काही अपवादात्मक कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहून वाखाणण्याजोगी कामगिरी केली आहे. (कार्यालय प्रतिनिधी)