दिग्रस वीज वितरण कंपनीचा अभियंता एसीबीच्या जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 22:16 IST2018-05-18T22:16:37+5:302018-05-18T22:16:37+5:30
ले-आऊटमधील विद्युतीकरणाच्या इस्टीमेटला मंजुरी देण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना येथील वीज वितरण कंपनीच्या उपकार्यकारी अभियंत्याला शुक्रवारी रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई यवतमाळ लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने केली.

दिग्रस वीज वितरण कंपनीचा अभियंता एसीबीच्या जाळ्यात
लोकमत न्यूज नेटवर्क
दिग्रस : ले-आऊटमधील विद्युतीकरणाच्या इस्टीमेटला मंजुरी देण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना येथील वीज वितरण कंपनीच्या उपकार्यकारी अभियंत्याला शुक्रवारी रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई यवतमाळ लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने केली.
गणेश श्रीराम चव्हाण (४१) असे लाचखोर वीज अभियंत्याचे नाव आहे. शुक्रवारी दुपारी १ वाजता कार्यालयातील आपल्या कक्षातच लाच घेताना त्याला रंगेहात पकडण्यात आले. दिग्रस येथील सचिन बनगनीवार यांच्या ले-आऊट आणि कॉप्लेक्समधील विद्युतीकरणाच्या इस्टीमेटला मंजुरी देण्यासाठी उपकार्यकारी अभियंता गणेश चव्हाण याने १५ हजार रुपयांची मागणी केली. त्यावरून सचिन बनगीनवार यांनी यवतमाळच्या लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार केली. त्यावरून शुक्रवारी सापळा रचण्यात आला. आपल्या कक्षात लाच घेताना गणेश चव्हाण याला रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई एसीबीचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर, नीलेश पखाले, अनिल ठाकूर, भारत चिरडे, किरण खेडकर, सचिन भोयर, महेश वाकोडे, वसीम शेख यांनी केली. या कारवाईने वीज वितरण कंपनीच्या वर्तुळात एकाच खळबळ उडाली.