महावितरणमध्ये कर्मचाऱ्यांचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 21:58 IST2018-04-14T21:58:46+5:302018-04-14T21:58:46+5:30
महावितरणने दिलेले उद्दीष्ट पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा येथील कार्यालयात गौरव करण्यात आला. व्यवसायाची आर्थिक घडी विस्कटल्यास एक तर तो व्यवसाय बंद करावा लागतो किंवा उधारी घेऊन कसाबसा चालवावा लागतो. महावितरण ही देखील एक कंपनी आहे.

महावितरणमध्ये कर्मचाऱ्यांचा गौरव
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरखेड : महावितरणने दिलेले उद्दीष्ट पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा येथील कार्यालयात गौरव करण्यात आला.
व्यवसायाची आर्थिक घडी विस्कटल्यास एक तर तो व्यवसाय बंद करावा लागतो किंवा उधारी घेऊन कसाबसा चालवावा लागतो. महावितरण ही देखील एक कंपनी आहे. कंपनीची अनेक ग्राहकांकडील थकबाकी दिवसेंदिवस वाढत आहे. महावितरणला आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देण्यासाठी सर्वांनाच जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. वरिष्ठांच्या आवाहनानुसार उमरखेड उपविभागातील अभियंते व कर्मचाऱ्यांनी ध्येयाने प्रेरीत होऊन मार्च महिन्यात वसुलीचे उद्दीष्ट साध्य केले. या कर्मचारयांचे मनोबल वाढविण्यासाठी सर्व अभियंते व कर्मचाऱ्यांचा पुसद विभागाचे कार्यकारी अभियंता दीपक देवहाते यांच्याहस्ते उमरखेड उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता ए. एस. वसुले यांच्या उपस्थितीत प्रशस्तिपत्र देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या दीपक राठोड, पी.डी. सातदिवे, बी.एम. नैताम, बी.जे. सिडाम, टाकणखारे, कराळे, इंगळे, चंदू बाभळे, हरण, राजू पवार, सक्करगे, चव्हाण, मो. तौफीक, गजानन काळबांडे, मो. आरीफ, नरवाडे, मुंढे आदींना गौरविण्यात आले.
सोशल मीडियाच्या माध्यमातून वीज बिल भरण्याबाबत व्यंगचित्रांद्वारे प्रबोधन केल्याबद्दल वरीष्ठ यंत्रचालक तथा व्यंगचित्रकार प्रभाकर दिघेवार यांचा विशेष गौरव करण्यात आला. याप्रसंगी ढेकर, श्रीकृष्ण दर्यानव मुनी, जयस्वाल यांनी वसुली उद्दीदष्टपूर्ती बाबत विचार मांडले. संचालन प्रभाकर दिघेवार, तर आभार प्रमोद वाळूककर यांनी मानले.