शहरं
Join us  
Trending Stories
1
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
2
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
3
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
4
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
5
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
6
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
7
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
8
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
9
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
10
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
11
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
12
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
13
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
14
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
15
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
16
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
17
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
18
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
19
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
20
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवारांच्या आॅनलाईन अर्जासाठी कर्मचारी दिमतीला

By admin | Updated: October 21, 2016 02:20 IST

नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारांना आॅनलाईन नामांकन अर्ज दाखल करावा लागणार आहे.

आर्णी : नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारांना आॅनलाईन नामांकन अर्ज दाखल करावा लागणार आहे. गुरुवारी तहसील कार्यालयात उपजिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी विजय भाकरे यांनी निवडणुकीच्या निमित्ताने ही माहिती दिली. आॅनलाईन नामांकनासाठी उमेदवारांना मदत व्हावी म्हणून तहसील व शहरातील महा ई-सेवा केंद्रांवर प्रशिक्षित कर्मचारी ठेवले जाणार आहे. प्रत्येक उमेदवाराला दीड लाख रुपयांची खर्च मर्यादा राहणार आहे. यात खर्चाचे नियमित विवरण द्यावे लागणार आहे. पारदर्शकतेसाठी प्रत्येक उमेदवाराला स्वतंत्र बँक खाते काढावे लागणार आहे. या खात्याद्वारेच निवडणूक खर्चाचा हिशेब सादर करावा लागणार आहे. खर्चाची पडताळणी होणार आहे. सोशल मीडियावरील प्रचारावर लक्ष राहणार आहे. आचारसंहितेचा भंग कुणी करत असेल, तर जनतेनेही लक्ष ठेवून माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले. मतदानापासून कोणीही वंचित राहू नये, याबाबत अडचण आल्यास तहसील कार्यालयात संपर्कासाठी स्वतंत्र कक्ष ठेवण्यात येईल किंवा निवडणूक अधिकारी विजय भाकरे, मुख्याधिकारी निर्मला राशीनकर, तहसीलदार सुधीर पवार यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले. (शहर प्रतिनिधी)