निवडणूक निधी एसटीच्या तिजोरीत
By Admin | Updated: April 21, 2015 01:34 IST2015-04-21T01:34:27+5:302015-04-21T01:34:27+5:30
यवतमाळ जिल्ह्यातील ४३४ ग्रामपंचायतींची निवडणूक २२ एप्रिल रोजी होत आहे.

निवडणूक निधी एसटीच्या तिजोरीत
यवतमाळ जिल्ह्यातील ४३४ ग्रामपंचायतींची निवडणूक २२ एप्रिल रोजी होत आहे. २ हजार ८४७ जागांसाठी ७ हजार ६२६ उमेदवार निवडणूक रिंगणात आहे. जिल्ह्यात १ हजार २३७ मतदान केंद्र निर्माण करण्यात आले असून त्यासाठी ४ हजार ४९८ कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून ४९२ कर्मचारी राखीव आहे. तसेच निवडणूक बंदोबस्तासाठी १८०० पोलिसांना तैनात केले जाणार आहे. ग्रामपंचायत निवडणुकीतील उमेदवारांसह प्रशासनही निवडणुकीसाठी सज्ज झाले. गावागावात प्रचार चरम सीमेला पोहोचला असताना प्रशासन मात्र विवंचनेत आहे. तोकड्या निधीत निवडणूक घ्यायची कशी, कर्मचाऱ्यांना मानधन द्यायचे कसे असे एक ना अनेक प्रश्न प्रशासनापुढे निर्माण झाले आहे.