सनकी पतीने कुऱ्हाडीचे घाव घालून केला पत्नीचा खून अन्...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2021 17:55 IST2021-10-10T17:38:43+5:302021-10-10T17:55:50+5:30

कौटुंबिक कलहातून उत्पन्न झालेल्या भांडणात पतीने रागाच्या भरात पत्नीवर कुऱ्हाडीने सपासप वार केले. या घटनेत महिला जागीच ठार झाली असून आरोपी पतीने स्वत:च पोलीस ठाण्यात जाऊन गुन्ह्याची कबुली दिली.

The eccentric husband killed his wife with an ax | सनकी पतीने कुऱ्हाडीचे घाव घालून केला पत्नीचा खून अन्...

सनकी पतीने कुऱ्हाडीचे घाव घालून केला पत्नीचा खून अन्...

ठळक मुद्देपंगडी येथील घटना : घाटंजी पाेलीस ठाण्यात स्वत:च दिली खुनाची कबूली

यवतमाळ : घाटंजी तालुक्यातील पंगडी येथे घरघुती वादातून सनकी पतीने कुऱ्हाडीचे घाव घालून पत्नीचा खून केला. ही घटना रविवारी सकाळी घडली. त्यांनर पतीनेच घाटंजी पाेलीस ठाणे गाठून खुनाची माहिती देत गुन्हा कबूल केला. दीक्षा ठाकरे (वय ३०) असे मृत महिलेचे नाव असून संतोष गुरुदेव ठाकरे, (रा. पंगडी) असे आरोपी पतीचे नाव  आहे. 

संतोषचे शनिवारी रात्री पत्नी दीक्षासोबत घरगुती कारणावरुन भांडण झाले. संतोष रात्रीच्या वादाचा राग डोक्यात ठेऊन होता. त्याने सकाळी ६ वाजता पुन्हा पत्नीबरोबर वाद घातला आणि रागाच्या भरात दीक्षाच्या मानेवर, डोक्यावर सात घाव घालून तिला जागीच ठार केले. यानंतर, संताेष थंड डाेक्याने स्वत:च गुन्ह्याची माहिती देण्यासाठी घाटंजी पाेलीस ठाण्यात पाेहाेचला.

संताेषने सांगितलेल्या थरारक घटनेनंतर पाेलिसांनी थेट पंगडी हे गाव गाठले. पांढरकवडा उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. गुन्ह्याचा अधिक तपास घाटंजी पोलीस निरीक्षक मनीष दिवटे, सहायक पोलीस निरीक्षक किशोर भुजाडे व बिट जमादार प्रदीप मेसरे करीत आहे. घटनास्थळ पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घाटंजी ग्रामीण रुग्णालयात पाठविला आहे. आरोपिला संताेष अटक करण्यात आली आहे. त्याच्या विराेधात कलम ३०२ भादंविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठाकरे दाम्पत्याला सात वर्षाची एक मुलगी व पाच वर्षांचा मुलगा आहे. आता आईचा मृत्यू झाला आणि वडील कारागृहात गेल्याने ही दाेन्ही चिमुकले उघड्यावर आली आहेत.

Web Title: The eccentric husband killed his wife with an ax