रूपेश उत्तरवार।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोजागिरीच्या चांदण्यात दूध पिणे आरोग्यदायी मानले जाते. मात्र हेच दूध भेसळयुक्त असल्याने आरोग्यावर दुष्परिणामाचा धोका आहे. जिल्ह्यात दरदिवसाला सव्वालाख लिटर दुधाची गरज असते. प्रत्यक्षात डेअरीपर्यंत ७० हजार लिटरच दुध पोहचते. यानंतरही बाजारात ४० हजार लिटर दुधाचा तुटवडा निर्माण होतो. तुटवड्यानंतरही भेसळीतून हा पुरवठा होतो. त्याकरिता नानाविध युक्त्या वापरल्या जातात.वैद्यकीय अहवालानुसार प्रती माणसी दर दिवसाला २१४ मिलीग्राम दुधाची गरज असते. यानुसार जिल्ह्याच्या लोकसंख्येला साडेचार लाख लिटर दुधाची गरज आहे. तरी काटकसरीनुसार याच्या २५ टक्केच मागणीनुसार सव्वालाख लिटर दूध जिल्ह्याला ग्राह्य धरले जाते. त्यातही ७० हजार लिटर दुध डेअरीपर्यंत पोहचविले जाते. मात्र ग्राहकापर्यंत सव्वालाख लिटर दुध पोहचते.अशी केली जाते दुधात भेसळदुधाचे संकलन वाढविण्यासाठी दुधात पाणी मिसळले जाते. यासोबतच स्टार आरारूट पावडर, मालटोज मक्यापासून बनविलेले पावडर, मीठ आणि अधिक दुधासाठी जनावरांना इंजेक्शन दिले जाते. या पध्दतीचा अवलंब केल्याने दुधात पाणी टाकले तरी दुध घट्ट दिसते. मात्र त्याचा मानवी आरोग्यावर परिणाम होतो. भेसळ ओळखण्यासाठी काही प्रयोग आहेत. क्लिस्टराईन कॉपर अॅसिटेटचे काही थेंब दुधात टाकले आणि त्याला तीन मिनिटे तापविले तर दुधाचा लेअर वेगळा होतो. यामध्ये फॉस्पेट टाकले तर दुधाचा रंग बदलतो. कुणाला दुधावर संशय आला, तर शासकीय संकलन केंद्रात त्याची चाचणी करता येते.कोजागिरीचे दुध सावधतेने खरेदी कराजिल्ह्यात दुधाचा तुटवडा आहे. अशा स्थितीत दूध पोहचविणारा भैया प्रत्येकाला दुध पुरविण्याचे आश्वासन देतो. दुध मर्यादित असताना अतिरिक्त दुध कुठून येते, हा संशोधनाचाच विषय आहे. यासाठी प्रत्येक ग्राहकाने सजग राहून दुधाची खरेदी करण्याची गरज आहे. तरच दुधाच्या भेसळीला निर्बंध लावता येणार आहे.जिल्ह्यातील शासकीय दुध संकलन १८०० लिटरवरून ३८०० लिटरवर पोहचले आहे. खासगी डेअरीचे संकलनही वाढत आहे. याचबरोबर भेसळीसाठी नानाविध फंडेही वापरले जात आहे. यामुळे ग्राहकांनी सावध राहण्याची नितांत गरज आहे.- प्रमोद देशमुख,सहायक जिल्हा दुग्ध व्यवसाय अधिकारी, यवतमाळअसे उपलब्ध होते दूधशासकीय केंद्र - ३८०० लिटरअमुल डेअरी - १८००० लिटरअमृत दूध - ७००० लिटररानडे दुध - ८००० लिटरवात्सल्य दुध - ८००० लिटरनमस्कार दुध - ७००० लिटर(इतर आणि खुले दुध)एकूण संकलन- ७० हजार लिटर
कोजागिरीच्या दुधाला भेसळीचे ग्रहण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 23:34 IST
कोजागिरीच्या चांदण्यात दूध पिणे आरोग्यदायी मानले जाते. मात्र हेच दूध भेसळयुक्त असल्याने आरोग्यावर दुष्परिणामाचा धोका आहे. जिल्ह्यात दरदिवसाला सव्वालाख लिटर दुधाची गरज असते. प्रत्यक्षात डेअरीपर्यंत ७० हजार लिटरच दुध पोहचते.
कोजागिरीच्या दुधाला भेसळीचे ग्रहण
ठळक मुद्देमागणी सव्वालाख लिटरची : डेअरीत येते ७० हजार लिटर दूध, ४० हजार लिटर संशयास्पद