शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
4
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
5
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
6
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
7
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
8
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
9
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
10
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
11
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
12
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
13
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
14
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
15
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
16
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
17
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
18
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
19
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
20
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

द्वारकाप्रसाद शर्मा उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचे धनी

By admin | Updated: April 13, 2015 00:51 IST

माणसातील माणूसपण ओळखून त्यांच्याशी आपुलकीने वागणारे आणि सर्वांच्या सुख:दुखात धावून जाणारे उत्तुंग

संजय राठोड : अमृत महोत्सवी हृद्यसत्कारयवतमाळ : माणसातील माणूसपण ओळखून त्यांच्याशी आपुलकीने वागणारे आणि सर्वांच्या सुख:दुखात धावून जाणारे उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचे धनी म्हणजे द्वारकाप्रसाद शर्मा होय. त्यांनी अनेकांना संकटात मदत केली, लोकोपयोगी कार्यात स्वत:ला वाहून घेतले अशा या व्यक्तिमत्त्वाचा सत्कार म्हणजे माणुसकीचा गौरव होय, असे प्रतिपादन यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी केले. येथील दर्डा मातोश्री सभागृहात द्वारकाप्रसाद शर्मा अमृत महोत्सवी सत्कार समितीच्यावतीने रविवारी आयोजित अमृत महोत्सवी सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रसिद्ध साहित्यिक प्रा.डॉ. शरदचंद्र कळणावत होते. प्रमुख पाहुणे म्हणून लोकमत मीडिया प्रा.लि.च्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन खासदार विजय दर्डा, नगराध्यक्ष सुभाष राय उपस्थित होते. पालकमंत्री राठोड म्हणाले, माणूस समोर असला की त्याच्याबद्दल नेहमीच चांगले बोलले जाते. परंतु पाठीमागे चांगले बोलले जाईल, याची खात्री नसते. मात्र द्वारकाप्रसाद शर्मा त्याला अपवाद आहे. त्यांच्या सहवासात आलेला प्रत्येक व्यक्ती त्यांच्या मागेही कार्याचा गौरवच करताना दिसला, हे मी अनुभवले आहे. स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांचे सहकारी म्हणून त्यांनी मोठे काम केले. आणखी त्यांच्या हातून मानवसेवा घडावी, असे पालकमंत्री राठोड म्हणाले. (शहर वार्ताहर)अशी श्रीमंती बघितली नाही - विजय दर्डाअनेक श्रीमंतांची गरिबी आपण पाहिली आहे. परंतु एखाद्या गरिबाला अशा पद्धतीने श्रीमंत होताना पाहिले नाही. द्वारकाप्रसाद शर्मा परिश्रम, निष्ठा, विश्वास आणि काम करण्याचे सातत्य यातून कर्मवीर आणि धर्मवीर झाले आहे. आपल्या साध्या राहणीमानातून त्यांनी सर्वांना जिंकले. ते जीवन जगण्याची कला शिकविणारे व्यक्तिमत्व असल्याने लोकांचे द्वारकाधीश झाले आहे, असे प्रतिपादन लोकमत मीडिया प्रा.लि.च्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन खासदार विजय दर्डा यांनी केले. गंगा सदैव वाहत असते आणि किनाऱ्यालाही पवित्र करते, असे व्यक्तिमत्व द्वारकाप्रसाद शर्मा यांचे आहे. मानवतेचे पुजारी असलेल्या शर्माजींना आपण सदैव काम करतानाच पाहिले. हा अमृत महोत्सवी सत्कार नाही तर तो महाउत्सव असे सांगत खासदार दर्डा म्हणाले. बाबूजींनी त्यांच्यातील गुण हेरले आणि तेही बाबूजींच्या विश्वासास पात्र ठरले. माझ्या स्वाक्षरीचेही तेच जन्मदाता असून दर्डा परिवाराच्या यशात शर्माजींचे मोठे योगदान आहे. त्यांची आम्ही शताब्दी साजरी करू, असे खासदार दर्डा यांनी सांगितले. द्वारकाप्रसाद शर्मा यांना कार्यक्रम स्थळी वाजत गाजत आणण्यात आले. हाच धागा पकडून खासदार विजय दर्डा म्हणाले, शर्माजींचे लग्न झाले तेव्हा असे वाजत गाजत आणले नसेल आणि एवढे वऱ्हाडीही नसतील. आज मात्र तुमच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यासाठी एवढी मंडळी उपस्थित असल्याचे त्यांनी सांगितले.