दूरचित्रवाहिन्यांमुळे जिल्हावासीयांना हिंदी झाली आवडीची
By Admin | Updated: September 14, 2015 02:36 IST2015-09-14T02:36:53+5:302015-09-14T02:36:53+5:30
हिंदी ही आपली राष्ट्रभाषा आहे. जिल्ह्यातील मराठमोळ्या माणसांपर्यंत हिंदी भाषेची खरी नजाकत पोहचविण्याचे काम दूरचित्रवाहिन्यांनीही केले आहे.

दूरचित्रवाहिन्यांमुळे जिल्हावासीयांना हिंदी झाली आवडीची
यवतमाळ : हिंदी ही आपली राष्ट्रभाषा आहे. जिल्ह्यातील मराठमोळ्या माणसांपर्यंत हिंदी भाषेची खरी नजाकत पोहचविण्याचे काम दूरचित्रवाहिन्यांनीही केले आहे. अनेक मराठी भाषिक कुटुंबातही आज अस्खलित हिंदी बोलली जाते. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, शालेय अभ्यासक्रमातही हिंदी हा विषय विद्यार्थ्यांचा सर्वाधिक आवडीचा झाला आहे.
अलीकडच्या काळात हिंदी भाषेला संपर्क भाषा म्हणूनही ओळखले जाते. तामीळ, बंगाली, कन्नड, गुजराती, मराठी, पंजाबी यासह अनेक भाषा प्रांतनिहाय बदलतात. मात्र, या सर्व भाषिकांना हिंदी भाषेने एकत्र जोडून ठेवले आहे. इतर प्रांतातील भाषा कळत नसली तरी जनसंपर्कासाठी हिंदीचा वापर केला जातो. जिल्ह्याला लागूनच तेलंगणा राज्य आहे. शेकडो गावांचा तेलंगणातील गावांशी दैनंदिन संपर्क येतो. अशावेळी अनेकांना हिंदी भाषेतून संपर्क साधणे सहज शक्य होते. त्यामुळेच हिंदी भाषेचे राष्ट्रभाषा हे स्थान सार्थ ठरले आहे.
प्रत्येक कार्यालयात हिंदीचा वापर करावा, असा नियम आहे. असे असले तरी, तो तितकासा होत नाही. यामुळे सर्वसामान्यांपुढे मोठ्या अडचणी निर्माण होतात. यातून हिंदीचा वापर व्हावा मुद्दा पुढे आला आहे. (शहर वार्ताहर)