शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थीच मिळत नसल्याने सहा वर्षांत जिल्ह्यातील १४ डी.एड. काॅलेज बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2020 05:00 IST

जिल्ह्यात एकूण २७ अध्यापक विद्यालये असली तरी त्यातील मोजक्याच विद्यालयांमध्ये विद्यार्थी प्रवेशित आहेत.  या २७ विद्यालयांमध्ये डी.एड.च्या एकूण १७४० जागा उपलब्ध आहेत. मात्र, मागील सत्रात डी.एड.च्या पहिल्या वर्षाला केवळ ३६० तर द्वितीय वर्षाला २८३ विद्यार्थी होते. म्हणजेच, गेल्यावर्षी डी.एड.च्या १३८० जागा रिक्त राहिल्या. तर यंदा २०२०-२१ या सत्राकरिता केवळ १९१ विद्यार्थ्यांचे अर्ज आले आहेत. 

ठळक मुद्देशिक्षक भरतीवरील बंदीचा विपरित परिणाम

  लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शिक्षणाचा उपयोग कुठे ना कुठे होतोच, पण व्यावसायिक अभ्यासक्रमाचे शिक्षण घेतल्यावरही संबंधित व्यवसायात स्थानच मिळत नसेल, तर अशा अभ्यासक्रमाला कोण पसंती देणार? नेमकी हीच परिस्थिती डी.एड. अभ्यासक्रमाबाबत उद्भवली आहे. गेल्या दहा वर्षांपासून राज्यात शिक्षक भरती बंद होती. त्यामुळे जिल्ह्यातील डी.एड. काॅलेजेसना वाईट दिवस पाहावे लागत असून गेल्या सहा वर्षांत तब्बल अध्यापक विद्यालये बंद झाल्याची गंभीर बाब पुढे आली आहे. जिल्ह्यात एकूण २७ अध्यापक विद्यालये असली तरी त्यातील मोजक्याच विद्यालयांमध्ये विद्यार्थी प्रवेशित आहेत.  या २७ विद्यालयांमध्ये डी.एड.च्या एकूण १७४० जागा उपलब्ध आहेत. मात्र, मागील सत्रात डी.एड.च्या पहिल्या वर्षाला केवळ ३६० तर द्वितीय वर्षाला २८३ विद्यार्थी होते. म्हणजेच, गेल्यावर्षी डी.एड.च्या १३८० जागा रिक्त राहिल्या. तर यंदा २०२०-२१ या सत्राकरिता केवळ १९१ विद्यार्थ्यांचे अर्ज आले आहेत. 

पुन्हा दोन संस्थांचा प्रस्तावविद्यार्थ्यांविना अध्यापक विद्यालये चालविणे शिक्षणसंस्थांनाही जड जात आहे. त्यामुळे १४ महाविद्यालये बंद झाली. तर आता पुन्हा दोन विद्यालये बंद करण्याचा प्रस्ताव संबंधित संस्थांनी प्रशासनाकडे दिला आहे. त्यातील एक विद्यालय यवतमाळ शहरातील असून दुसरे विद्यालय दारव्हा शहरातील आहे. मात्र, त्यावर अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही.

विशेष फेरी अद्याप रिक्त राहिलेल्या जागा भरण्यासाठी विशेष फेरी राबविली जात आहे. त्यामुळे अनेकांना अर्ज दाखल करण्याची संधी आहे. 

वर्मा समितीच्या निकषात न बसणारे १४ डी.एड. काॅलेज बंद झाले आहेत. २०१४ या सत्रापासून ही अध्यापक विद्यालये बंद झाली आहेत. - डाॅ. रमेश राऊत, प्राचार्य डायट, यवतमाळ

मी २०१२-१३ मध्ये डी.एड. केले. मात्र, तेव्हापासून शासनाने शिक्षक भरतीच केलेली नाही. टीईटीही दिली आहे. भरती सुरू झाल्याविना डी.एड. काॅलेजचे महत्त्व वाढणार नाही.- सुमित निकम, उमेदवार तरुण

 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र