अपघातग्रस्त ट्रेलरच्या चालकाची ३ तासानंतर सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 17:52 IST2021-03-16T17:52:14+5:302021-03-16T17:52:37+5:30
Yawatmal news महागाव तालुक्यातील सवना येथे सिमेंट वाहतूक करणारा ट्रेलर अनियंत्रित होऊन झाडावर धडकला. घटनास्थळी धाव घेणाऱ्या नागरिकांनी ३ तास शर्थीचे प्रयत्न करून चालकाचा जीव वाचविला.

अपघातग्रस्त ट्रेलरच्या चालकाची ३ तासानंतर सुटका
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्यात महागाव तालुक्यातील सवना येथे सिमेंट वाहतूक करणारा ट्रेलर अनियंत्रित होऊन झाडावर धडकला. काळजाचा ठोका चुकविणाऱ्या या अपघातात चुराडा झालेल्या ट्रेलरच्या केबीनमध्ये चालक अडकून पडला होता. घटनास्थळी धाव घेणाऱ्या नागरिकांनी ३ तास शर्थीचे प्रयत्न करून चालकाचा जीव वाचविला. रामराव गोरे असं चालकाचं नाव आहे. या अपघातात हा युवक गंभीर जखमी झाला आहे. अनेकवेळा फोन करूनही पोलीस वेळेवर पोहचले नाही. त्यामुळे शेवटी गॅस कटरने केबीनचा पत्रा कापून गावकऱयांनी चालकास बाहेर काढले. यानंतर या युवकास पुसद शासकीय रुग्णालयात उपचारार्थ पाठविले .