शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! खुद्द स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

नेर शहरातील नागरिकांची गैरसोय होऊ देऊ नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2020 05:00 IST

व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने सात दिवसांचा बंद ठेवला, असे सांगून पालकमंत्री म्हणाले, नागरिकांच्या सुविधेकरिता अत्यावश्यक वस्तूंच्या सेवेची दुकाने सकाळी ८ ते १२ या वेळेत सुरू ठेवण्याबाबत नियोजन करावे, अशा सूचना केल्या. येथील क्वारंटाईने सेंटरमध्ये ९४ रुग्ण आहे. या सेंटरची साफसफाई आणि येथे असलेल्या नागरिकांच्या जेवणाकडे लक्ष द्यावे, अशा सूचनाही केल्या.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांचे निर्देश, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांसह नेर येथे पाहणी, परिस्थितीचा आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कनेर : शहरात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. प्रशासनाने शहरातील काही भाग प्रतिबंधित घोषित केला. प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याकडे प्रशासनाने लक्ष देण्याचे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी दिले.येथील नवाबपुरा या प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी करून आढावा घेताना ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष कालिंदा पवार, जिल्हाधिकारी एम.डी. सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, श्रीकांत देशपांडे, इब्राहीम चौधरी आदी उपस्थित होते.व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने सात दिवसांचा बंद ठेवला, असे सांगून पालकमंत्री म्हणाले, नागरिकांच्या सुविधेकरिता अत्यावश्यक वस्तूंच्या सेवेची दुकाने सकाळी ८ ते १२ या वेळेत सुरू ठेवण्याबाबत नियोजन करावे, अशा सूचना केल्या. येथील क्वारंटाईने सेंटरमध्ये ९४ रुग्ण आहे. या सेंटरची साफसफाई आणि येथे असलेल्या नागरिकांच्या जेवणाकडे लक्ष द्यावे, अशा सूचनाही केल्या.बैठकीप्रसंगी तहसीलदार अमोल पोवार, मुख्याधिकारी नीलेश जाधव, बीडीओ युवराज मेहत्रे, डॉ.रवींद्र दुर्गे, नगरपरिषदेचे उपाध्यक्ष पवन जयस्वाल, मनोज नाल्हे, दीपक आडे, भाऊराव ढवळे, प्रवीण राठोड आदी उपस्थित होते.दारव्हा ग्रामीण रुग्णालयालाही दिली भेटदारव्हा येथे दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत असल्याने पालकमंत्री संजय राठोड यांनी शहरातील शिवाजीनगर या प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी केली. उपजिल्हा रुग्णालयाला भेट दिली. क्वॉरंटाईन असलेल्या नागरिकांशी संवाद साधला. यावेळी तहसीलदार डॉ. संतोष डोईफोडे यांनी पीपीटी सादरीकरणाद्वारे कोव्हीड - १९ बाबत पालकमंत्र्यांना माहिती दिली. बैठकीला अपर जिल्हाधिकारी सुनील महिंद्रीकर यांच्यासह स्थानिक अधिकारी आदी उपस्थित होते.उपाययोजनांवर पीपीटीद्वारे सादरीकरणनेर येथे विश्रामगृहात झालेल्या बैठकीत पालकमंत्री संजय राठोड यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी प्रतिबंधित क्षेत्राबाबत तसेच कोरोना संदर्भात प्रशासनाने केलेल्या उपाय योजनांबाबत पीपीटीद्वारे सादरीकरण केले. नेर येथे ३७ पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या