शहरं
Join us  
Trending Stories
1
हिमाचल प्रदेश: बिलासपूरमध्ये बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला, १५ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
3
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
4
Bigg Bossचं घर सील, सर्व स्पर्धकांना लवकरच काढणार बाहेर, समोर आलं असं कारण 
5
ICC Womens World Cup 2025 : हेदर नाइटचा हिट शो! इंग्लंडनं बांगलादेशला पराभूत करत भारताला दिला धक्का
6
कस्तुरबा रुग्णालयातील पुस्तक वाटप प्रकरणाला वेगळं वळण, किशोरी पेडणेकरांचा तक्रारदारालाच प्रतिप्रश्न, म्हणाल्या...
7
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
8
अभिषेक शर्मा ICC पुरस्काराच्या शर्यतीत; त्याला कुलदीपसह झिम्बाब्वेचा गडी देणार टक्कर!
9
भर वर्गात महिलेसोबत आक्षेपार्ह चाळे करताना सापडला शिक्षक, मुलांनी रेकॉर्डे केला व्हिडीओ, कुठे घडली घटना
10
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
12
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
13
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
14
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
15
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
16
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
17
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
18
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
19
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण
20
₹450 कोटींचा बंगला अन् ₹639 कोटींचा डुप्लेक्स..; धनकुबेरांना आकर्षित करतेय वरळी 'सी फेस'

तुम्हीही धान्यात कीडनाशक गोळ्या ठेवता का? धान्य टिकवण्याच्या नादात जीव टाकताय धोक्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 20:13 IST

Yavatmal : धान्यात रसायनांचा असुरक्षित वापर, निष्काळजीपणाचा धोकादायक

लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : धान्यात वापरल्या जाणाऱ्या कीडनाशक पावडरच्या रासायनिक प्रक्रियेतून गॅस तयार होऊन विषबाधा झाल्याने दोन लहान मुलांचा बळी गेल्याची हृदयद्रावक घटना अहिल्यानगर येथे घडली. गहू, तांदूळ, कडधान्य वर्षभर टिकवण्यासाठी बोरिक पावडर आणि सेल्फॉससारख्या गोळ्यांचा वापर ग्रामीण भागात होतो. मात्र, या रसायनांचा असुरक्षित वापर निष्काळजीपणाचा कळस गाठतो आणि कळत-नकळतपणे मानवी जीवनासाठी मोठा धोका निर्माण करतो. ही रसायने जीवघेणी असल्याने त्यांच्या वापराबद्दल तज्ज्ञांचा सल्ला घेणे आणि त्यावर नैसर्गिक उपाय करणे गरजेचे आहे.

या कीडनाशकांचा सर्रास होतो वापर

धान्य टिकविण्यासाठी महिला वर्ग बोरिक पावडर, पांढरी पावडर, बोरिक अॅसिड आदी रसायनांचा वापर करतात. धान्यामध्ये विषारी अंश राहणे, ईडीसीटी मिश्र, इंजेक्शन/धुरी, इथेलिन डायक्लोराइड आणि कार्बन टेट्राक्लोराइड, धुरी पद्धत, गॅसमुळे श्वसनमार्गाला धोका होतो. 

सेल्फॉसमध्ये जहाल विषारी तत्त्वे

सेल्फॉस हे एक व्यावसायिक धुरीकरण कीडनाशक असून ते प्रथमोपचार न मिळणाऱ्या परिस्थितीत त्वरित जीवघेणे ठरू शकते.

कीडनाशक टाकताना काय काळजी घ्याल?

  • पर्यायी उपाय : शक्य असल्यास रासायनिक कीडनाशके वापरणे टाळा आणि नैसर्गिक उपायांचा वापर करा.
  • मात्रा : कीडनाशकाची मात्रा कृषी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच वापरा. जास्त वापर म्हणजे जास्त धोका.
  • हवाबंद : गोळ्या वापरल्यास धान्य किंवा साठवणुकीची जागा पूर्णपणे हवाबंद आणि लहान मुलांच्या आवाक्याबाहेर ठेवा.
  • हात धुवा : कीडनाशके हाताळताना ग्लोव्जचा वापर करा आणि नंतर हात साबणाने स्वच्छ धुवा.

 

धान्य टिकवण्याच्या नादात जीव धोक्यात

  • घरात साठवलेले धान्य किडीपासून वाचविण्यासाठी नागरिक अनेकदा असुरक्षित मार्ग निवडतात.
  • रासायनिक कीडनाशके जसे की बोरिक पावडर किंवा सेल्फॉस गोळ्या वापरताना त्यातील धोक्यांची पूर्ण माहिती नसते.
  • यातील विषारी घटक धान्यामध्ये राहू शकतात किंवा त्यांची रासायनिक प्रक्रिया होऊन धोका होऊ शकतो.

 

रासायनिक प्रक्रियेमुळे विषबाधेचा धोका

सेल्फॉस (अॅल्युमिनियम फॉस्फाइड) हे रसायन हवेतील किंवा धान्याच्या ओलाव्यामुळे एचटूओच्या संपर्कात येते, तेव्हा त्याची रासायनिक क्रिया होऊन फॉस्फाइन नावाचा अत्यंत जहाल विषारी वायू तयार होतो. हा वायू श्वसनावाटे शरीरात गेल्यास थेट फुफ्फुसे, हृदय आणि मेंदूवर हल्ला करतो, ज्यामुळे अवयव निकामी होऊन मृत्यू होतो.

English
हिंदी सारांश
Web Title : Pesticide Use in Grains: A Deadly Risk to Human Life

Web Summary : Using pesticides like boric powder and সেলফস to preserve grains poses severe health risks, even death. These chemicals release toxic gases, causing poisoning. Experts advise natural alternatives and caution against unsafe practices, emphasizing safe handling and storage to prevent fatal consequences.
टॅग्स :YavatmalयवतमाळLifestyleलाइफस्टाइलfood poisoningअन्नातून विषबाधाFood and Drug administrationअन्न व औषध प्रशासन विभागfoodअन्न