दिरानेच वहिनीचा खून केल्याचे निष्पन्न

By Admin | Updated: September 11, 2015 02:54 IST2015-09-11T02:54:14+5:302015-09-11T02:54:14+5:30

दोन दिवसापूर्वी पोखरी शिवारात सापडलेल्या अनोळखी महिलेच्या प्रेताची ओळख पटली असून तिचा चुलत दिराने तोंड दाबून खून केल्याचे निष्पन्न झाले.

Dnanech's wife killed | दिरानेच वहिनीचा खून केल्याचे निष्पन्न

दिरानेच वहिनीचा खून केल्याचे निष्पन्न

आरोपीने घेतले विष : पोखरीतील अनोळखी प्रेत
महागाव : दोन दिवसापूर्वी पोखरी शिवारात सापडलेल्या अनोळखी महिलेच्या प्रेताची ओळख पटली असून तिचा चुलत दिराने तोंड दाबून खून केल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान आरोपीने घटनेनंतर विष प्राशन केल्याचे उघडकीस आले.
रेणुका सुरेश राठोड (४१) रा. साखरा ता. दिग्रस असे मृत महिलेचे नाव आहे. ती आशा सेविका म्हणून कार्यरत होती. चुलत दीर सिद्धांंत उर्फ गोलू जगदेव राठोड (२४) याच्या सोबत झालेल्या वादात तिचा खून झाल्याचे निष्पन्न झाले. आरोपी सिद्धांतने तिला पोखरी शिवारात आणून तोंड दाबून तिचा खून केला असावा, असा कयास पोलिसांना आहे. पोलिसांनी गुरुवारी या प्रकरणी खुनाचा गुन्हा नोंदविला. दरम्यान या प्रकरणातील आरोपी सिद्धांतने घटनेच्या दिवशीच वहिणीचा खून केल्यानंतर स्वत:ही विष प्राशन केले. तो सध्या पुसदच्या एका खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे. त्यामुळे त्याला अटक करण्यात आली नाही. महागाव पोलीस अधिक तपास करीत आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Dnanech's wife killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.