शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
2
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
3
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
4
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
5
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
6
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
7
दर्यापुरात टोळक्याचा धुमाकूळ; अमरावती मार्गावर चालत्या वाहनांवर दगडफेक
8
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
9
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
10
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
11
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
12
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
13
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
14
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
15
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
16
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
17
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 
18
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
19
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
20
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 

जिल्हा मुख्यालय भरले, पंचायत समित्या रिकाम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2020 5:00 AM

शिक्षण विभागातील पर्यवेक्षणाचे महत्त्वाचे काम करणाऱ्या गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी केंद्र प्रमुखांच्या बदल्यांची प्रक्रिया राबविण्यात आली. विस्तार अधिकाऱ्यांची जिल्ह्यात ८८ पदे मंजूर आहेत. त्यापैकी ५५ पदे आधीच रिक्त आहेत. यात अधिकाधिक विस्तार अधिकाऱ्यांना यवतमाळात आणून ठेवले. त्यापैकी ८ प्राथमिक शिक्षण विभागात, ५ माध्यमिक शिक्षण विभागात तर ५ विस्तार अधिकारी यवतमाळ पंचायत समितीमध्ये देण्यात आले.

ठळक मुद्देशिक्षण विभागाच्या बदल्यांचा खेळखंडोबा, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुखांची पदे भरणार कोण?

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कारभार सुरळीत करण्यासाठी कोरोनासारख्या कठीण काळातही जिल्हा परिषदेनेबदली प्रक्रिया राबविली. मात्र यात अधिकारी कर्मचाऱ्यांना जिल्हा मुख्यालयात आणून उर्वरित १५ पंचायत समित्यांमध्ये खुर्च्या रिकाम्या सोडण्यात आल्या. प्रामुख्याने शिक्षण विभागात हा बदल्यांचा खेळखंडोबा पुढे आल्याने कोरोनानंतरचा शैक्षणिक कारभार अडखळण्याची शक्यता आहे.शिक्षण विभागातील पर्यवेक्षणाचे महत्त्वाचे काम करणाऱ्या गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी केंद्र प्रमुखांच्या बदल्यांची प्रक्रिया राबविण्यात आली. विस्तार अधिकाऱ्यांची जिल्ह्यात ८८ पदे मंजूर आहेत. त्यापैकी ५५ पदे आधीच रिक्त आहेत. यात अधिकाधिक विस्तार अधिकाऱ्यांना यवतमाळात आणून ठेवले. त्यापैकी ८ प्राथमिक शिक्षण विभागात, ५ माध्यमिक शिक्षण विभागात तर ५ विस्तार अधिकारी यवतमाळ पंचायत समितीमध्ये देण्यात आले. त्यामुळे राळेगाव, महागाव, आर्णी, नेर, घाटंजी, पांढरकवडा, वणी या पंचायत समितीत एकही शिक्षण विस्तार अधिकारी उरलेला नाही.गटशिक्षणाधिकाऱ्यांची अवस्था तर यापेक्षाही भयंकर आहे. नेर, झरी आणि दिग्रस वगळता सर्वत्र प्रभारावर काम सुरू होते. आता नेरचे गटशिक्षणाधिकारी राजीव ठाकरे यांची शिक्षणाधिकारी म्हणून बढती झाली. झरीचे हाडाळे अकोल्यात बदलीवर गेले. तर दिग्रसच्या शिकारे यांची याच महिन्याअखेरीस निवृत्ती आहे. त्यामुळे १६ पैकी एकाही पंचायत समितीत आता गटशिक्षणाधिकारी उरणार नाही. केंद्र प्रमुखांच्या जागा न भरल्याने हेही काम प्रभारावर निभावून नेले जात आहे. तर दुसरीकडे बदली प्रक्रियेतून एकट्या यवतमाळ पंचायत समितीमध्येच १३ केंद्र प्रमुख घेण्यात आले आहे. विस्तार अधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्याने अनेक पंचायत समित्यांनी चक्क शालेय पोषण आहार अधीक्षकांना हा प्रभार दिला.शिक्षकांच्या विनंती बदल्याही स्थगितजिल्हा परिषद शिक्षकांचीही प्रक्रिया प्रशासनाने सुरू केली होती. मात्र ग्रामविकासच्या निर्देशानुसार प्रशासकीय बदल्या थांबविण्यात आल्या. विनंती बदल्यांची प्रक्रियाही अंतिम क्षणी स्थगित करण्यात आली. त्याबाबत सीईओ डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी शनिवारी आदेश निर्गमित केला. कोरोना संसर्गाचा त्यासाठी हवाला देण्यात आला आहे.बदलीस इच्छुक शिक्षकांचे आज आंदोलनन्यायालय, विभागीय आयुक्तांचे आदेश असूनही जिल्हा परिषदेने पाच शिक्षकांची बदली टाळली, असा आरोप इब्टा शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिवाकर राऊत यांनी केला. शिवाय यंदा विनंती बदल्यांसाठी शेकडो शिक्षक इच्छूक असताना बगल देण्यात आली. इतर विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या कोरोना काळातच केलेल्या असताना शिक्षक बदल्यांनाच कोरोनाचा धोका कसा, हा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. बदल्या करण्याच्या मागणीसाठी शिक्षक रविवारी आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :zpजिल्हा परिषदTransferबदली