शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बॅंकेची १०५ व ४२ ची नोकरभरती प्रक्रिया लांबणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 23:30 IST

जिल्हा बॅंकेच्या संचालक मंडळाची बैठक शुक्रवारी पार पडली. विविध १६ विषयांवर सायंकाळपर्यंत चाललेल्या या बैठकीबाबत बॅंकेचे अध्यक्ष प्रा. टिकाराम कोंगरे यांनी ‘लोकमत’ला माहिती दिली. कोंगरे म्हणाले, मागासवर्गीयांच्या ४२ जागांची नोकरभरती प्रक्रिया राबवायचीच आहे. परंतु सध्या ती लगेच राबविणे शक्य नाही. त्यामुळे उच्च न्यायालयाला पुन्हा थोडा अवघी वाढवून मागितला जाणार आहे.

ठळक मुद्देन्यायालयाला वेळ वाढवून मागणार : तक्रारी तपासून घेणार

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची १०५ आणि ४२ जागांच्या नोकरभरतीबाबतची पुढील प्रक्रिया काहीशी लांबणीवर पडली आहे. या प्रकरणात काही बाबी तपासून घेतल्या जाणार आहे.जिल्हा बॅंकेच्या संचालक मंडळाची बैठक शुक्रवारी पार पडली. विविध १६ विषयांवर सायंकाळपर्यंत चाललेल्या या बैठकीबाबत बॅंकेचे अध्यक्ष प्रा. टिकाराम कोंगरे यांनी ‘लोकमत’ला माहिती दिली. कोंगरे म्हणाले, मागासवर्गीयांच्या ४२ जागांची नोकरभरती प्रक्रिया राबवायचीच आहे. परंतु सध्या ती लगेच राबविणे शक्य नाही. त्यामुळे उच्च न्यायालयाला पुन्हा थोडा अवघी वाढवून मागितला जाणार आहे. १०५ जागांच्या नोकरभरती प्रक्रियेची अंतिम निवड यादी लावण्यापूर्वी काही बाबी तपासून घेतल्या जाणार आहेत. शुक्रवारी संचालक मंडळ बैठकीत काही सदस्यांनी या भरतीबाबत मुद्दे उपस्थित केले. त्यावर प्रशासनाकडेही कायदेशीर माहिती उपलब्ध नसल्याने सदस्यांनी उपस्थित केलेले मुद्दे तपासून पाहण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे कोंगरे यांनी सांगितले. या बैठकीत इतरही काही मुद्यांवर चर्चा करून निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आर्णी शाखेतील अपहाराचे नियमित लेखापरीक्षण सुरू असून त्याच्या अंतिम अहवालाची प्रतीक्षा असल्याचे कोंगरे यांनी सांगितले.दरम्यान, सूत्रानुसार संचालक मंडळ बैठकीत १०५ जागांच्या भरतीबाबत काही संचालकांनी आक्रमक भूमिका घेऊन वादंग घातल्याचे सांगितले जाते. नियमानुसार ४ एप्रिलपूर्वी ही भरती प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक आहे. अन्यथा न्यायालयाचा अवमान होईल याकडे लक्ष वेधले गेले. मात्र हा अवमान झाल्यास आम्ही जबाबदार नाही असे काही संचालकांनी लेखी दिल्याचेही सांगितले जाते. त्याचवेळी १०५ जागांच्या भरतीला एक वर्षापेक्षा जास्त दिवस झाल्याने ही भरती वैध ठरत नाही, त्यामुळे ती रद्द करून सर्व १०५ जागांसाठी नव्याने प्रक्रिया राबविण्याची मागणी काही संचालकांनी केल्याचे सांगितले जाते. याच मुद्यावरून आता संचालकांचे आक्षेप व तक्रारी तपासून पाहण्याचा निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

१५ टक्के पीक कर्ज वाढ  संचालकांच्या बैठकीत पीक कर्जाची मर्यादा सरसकट १५ टक्के वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र ही वाढ सशर्त राहणार असल्याचे टिकाराम कोंगरे यांनी सांगितले.

 

टॅग्स :bankबँक