शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँकेचे ४०० कोटी रुपयांचे व्यवहार वाचले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2020 05:00 IST

बँकेचा कॉस्ट ऑफ फंड वाढून नेट मार्जिनवरदेखील विपरित परिणाम झाला असता. जिल्हा बँक अल्पमुदतीचे व्यवहार करणारी संस्था असून राज्य सहकारी बँक, नाबार्डकडून फेर कर्ज घेऊन शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करते. हे फेरकर्ज प्राप्त होण्यास लागणाºया विलंबाच्या कालावधीत बँकेतील शासकीय निधी तात्पुरत्या स्वरूपात पीक कर्जाकरिता उपयोगात आणला जातो. त्यामुळे या निधीचा ‘ब्रिज फायनान्स’ म्हणूनही उपयोग होतो.

ठळक मुद्देमोठा दिलासा : उपमुख्यमंत्र्यांनी केवळ तीन दिवसात घेतली दखल, शासकीय कार्यालयांचे खाते राहणार कायम

मुकेश इंगोले।लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : शासकीय कार्यालयांचे खासगी, सहकार क्षेत्रातील बँकांमध्ये असलेले खाते बंद करून राष्ट्रीयकृत बँकेत उघडण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. मात्र या निर्णयात केवळ तीनच दिवसात काही अटीनुसार सुधारणा केल्याने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे जवळपास ४०० कोटींचे व्यवहार वाचले आहे.जिल्हा मध्यवर्ती बँकेचे ऑनलाईन व्यवहार यस बँकेमार्फत होत होते. याच बँकेचा आयएफएससी कोड वापरला जात होता. मात्र काही दिवसांपूर्वी रिझर्व बँकेने या बँकेवर निर्बंध टाकले. त्यामुळे जिल्हा बँकेचे अनेक व्यवहार अडचणीत आले. त्याच कारणामुळे राज्य शासनाचे उपसचिव ए.का. गागरे यांनी राज्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र पाठवून सर्व शासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, महामंडळे आदींनी खासगी अथवा सहकार क्षेत्रातील बँकांमध्ये असलेले खाते बंद करून केवळ राष्ट्रीयकृत बँकेत खाते उघडून सर्व व्यवहार पार पाडण्याच्या सूचना दिल्या. यामुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेवर मोठे संकट ओढवले.शासकीय कार्यालयांनी खाते बंद केल्यास ३०० ते ४०० कोटी रुपये राष्ट्रीयकृत बँकेत वळते करावे लागणार होते. परिणामी जिल्हा बँकेचा तरलतेचा प्रश्न निर्माण झाला असता. बँकेचा कॉस्ट ऑफ फंड वाढून नेट मार्जिनवरदेखील विपरित परिणाम झाला असता. जिल्हा बँक अल्पमुदतीचे व्यवहार करणारी संस्था असून राज्य सहकारी बँक, नाबार्डकडून फेर कर्ज घेऊन शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करते. हे फेरकर्ज प्राप्त होण्यास लागणाºया विलंबाच्या कालावधीत बँकेतील शासकीय निधी तात्पुरत्या स्वरूपात पीक कर्जाकरिता उपयोगात आणला जातो. त्यामुळे या निधीचा ‘ब्रिज फायनान्स’ म्हणूनही उपयोग होतो. त्यामुळे हा निधी वळता झाल्यास पीक कर्ज वाटपात खंड पडला असता. या बाबी लक्षात घेता महाराष्ट्र राज्य बँक असोसिएशनचे उपाध्यक्ष तथा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक वसंत घुईखेडकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र पाठवून बँकेची अडचण मांडली. त्याची दखल घेत ना. अजित पवार यांनी काही अटी व शर्तीनुसार निर्णयात सुधारणा करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव अरविंद कुमार यांनी १६ एप्रिलला जिल्हा परिषदेला पत्राद्वारे शासन निर्णय कळविला. त्यात जिल्हा परिषद पंचायत समिती लेखा संहिता १९६८ चे नियम ४९ तसेच ग्रामीण विकास विभागाच्या ११ फेब्रुवारीच्या पत्रानुसार यासंदर्भात सूचना आहेत.राज्यातील जिल्हा सहकारी बँकांना लाभशासनाच्या या निर्णयाचा राज्यातील सर्वच जिल्हा बँकांना लाभ होणार आहे. वसंत घुईखेडकर यांनी हा विषय त्वरित उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे लावून धरल्याने निर्णयात सुधारणा करण्यात आली आहे.

टॅग्स :bankबँक