शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ‘आशां’नी निर्माण केली नवी दिशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2020 05:00 IST

यंत्रणा खडबडून जागी झाली. ज्या भागात हे रुग्ण गवसले, तो संपूर्ण भाग सील करण्यात आला. आता या भागातील नागरिकांना कोरोनाची लागण झाली का, हे शोधण्याचे मोठे आव्हान प्रशासनापुढे आहे. या कामात मदतीचा हात देण्यासाठी आशा, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक पुढे आले आहे.

ठळक मुद्देकोरोनाविरूद्ध लढाई : संवेदनशील भागात ‘डोअर-टू-डोअर’ सर्वेक्षण

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : यवतमाळ शहरात नऊ कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळले. यामुळे यंत्रणा खडबडून जागी झाली. ज्या भागात हे रुग्ण गवसले, तो संपूर्ण भाग सील करण्यात आला. आता या भागातील नागरिकांना कोरोनाची लागण झाली का, हे शोधण्याचे मोठे आव्हान प्रशासनापुढे आहे. या कामात मदतीचा हात देण्यासाठी आशा, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक पुढे आले आहे.इंदिरानगर, जाफरनगर, ईस्लामपुरा, कुंभारपुरा, पवारपुरा, मेमन कॉलनी, शिंदेनगर हा दीड एकरचा संपूर्ण परिसर पिंजून काढला जात आहे. दररोज या भागातील सहा हजार कुटुंबांच्या घरी आरोग्य सेवक, आशा, अंगणवाडी सेविका, मदतनीस भेट देत आहे. ३३ हजार नागरिकांच्या आरोग्याची ते विचारपूस करीत आहे. यात त्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. संपूर्ण यंत्रणा नागरिकांना सर्दी, खोकला, ताप आदी लक्षणे आहे का, याचे सर्वेक्षण करीत आहे.रविना नामक आश स्वयंसविका पहाटे ५ वाजता त्या उठून घरकाम करतात. नंतर ९ ते दुपारी २ वाजतापर्यंत त्या आपली जबाबदारी पार पाडतात. त्यांना अनेक वाईट अनुभव आले. मात्र नागरिकांना तुमच्याच भल्यासाठी हे सर्वेक्षण असल्याचे सांगितल्यानंतर प्रतिसाद मिळतो. तथापि अनेकदा अपशब्द, अपमान सहन करावा लागतो, असे त्यांनी सांगितले. मात्र राष्टÑीय कार्य पूर्ण करायचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून या कामात झोकून दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.आशा, सुनिता, रुपाली यांनी शासनाने जी जबाबदारी दिली, ती प्रामाणिकपणे पार पाडत असल्याचे सांगितले. नागरिक बंदीस्त असताना आम्ही मात्र लोकांच्या दारोदार भटकत असून नागरिकांच्या भविष्याची चिंता आम्हाला सतावत असल्याचे त्यांनी सांगितले.छाया, सपना, वर्षा म्हणाल्या, सर्वेक्षण करताना कोरोना आपल्या मागे तर येणार नाही ना, अशी भीती वाटते. मात्र दुसऱ्याच क्षणी ही चिंता दूर सारत आम्ही काम करीत असल्याचे सांगितले. तथापि पीपीई किट मिळावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आरती, करुणा, लीला, पल्लवी यांनी सर्वेक्षण केल्यानंतर संशयितांना विलगीकरण कक्षात हलविले जाते असे सांगून नागरिकांमध्ये आपल्याप्रति रोष व्यक्त होत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. मात्र तरीही जनतेच्या भल्यासाठी विदसभर काम करीत असल्याचे स्पष्ट केले. नागरिकांच्या विविध प्रश्नांची उत्तरे देताना नाकीनऊ येते, असा अनुभवही त्यांनी कथन केला.दोन महिन्यांपासून वेतन नाहीआश स्वयंसेविका नि:स्वार्थपणे काम करीत असताना त्यांना गेल्या दोन महिन्यांपासून वेतन मिळाले नाही. दोन महिन्यांपासून आर्थिक अडचण असतानाही केवळ जनतेच्या आरोग्यसाठी त्या सर्वेक्षणात व्यस्तआहे. विशेष म्हणजे या सर्वेक्षणाचा मोबदलाही मिळणार की नाही, याबाबत साशंकता आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या