शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
वादग्रस्त 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"
4
Suvendu Adhikari : "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप
5
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
6
अधिक मास २०२६: मे मध्ये सुरू होणार अधिक मास तथा धोंड्याचा महिना; खगोलशास्त्राच्या नजरेतून पाहा 
7
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिश आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
8
जखमी पतीला रुग्णालयात नेण्यासाठी मागितले पैसे, नंतर पत्नीकडून रुग्णवाहिकाही स्वच्छ करून घेतली
9
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
11
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
12
Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज
13
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
14
अनिल अंबानींच्या ३०३४ कोटींच्या संपत्तीवर टाच; फ्लॅटपासून ते फार्महाऊस पर्यंत काय काय जप्त?
15
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
16
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स ३५० अंकांनी, तर निफ्टी १०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्सवर आज नजर
17
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
18
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
19
India Heatwave Alert: उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
20
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

दूषित पाण्यामुळे आजार बळावले

By admin | Updated: April 12, 2015 00:05 IST

तालुक्यातील ग्रामीण भागात दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून साथींच्या आजारात वाढ होत आहे़...

पांढरकवडा तालुका : अशुद्ध पाण्यामुळे ग्रामस्थ बेजार, फ्लोराईडयुक्त पाणीही आले नशिबीपांढरकवडा : तालुक्यातील ग्रामीण भागात दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून साथींच्या आजारात वाढ होत आहे़ग्रामीण भागात विहिरी, नद्या, नाले, हातपंप याद्वारे गावकरी आपली पाण्याची गरज भागवतात़ जनतेला शुद्ध पाणी पोहोचविणे ही शासनाची जबाबदारी आहे़ त्यासाठी शासनाकडून अनेक उपाययोजनाही केल्या जातात़ मात्र प्रशासनातर्फे त्याची योग्य ती अंमलबजावणी होत नसल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना स्वच्छ पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे़ ग्रामीण भागातील जनताही जे पाणी जशा प्रकारे मिळेल, ते पाणी प्राशन करून अनेक आजारांना निमंत्रण देत आहे़ग्रामीण भागातील नागरिकांना शुद्ध पाणी मिळावे म्हणून जिल्हा परिषदेमार्फत अनेक योजना कार्यान्वित करण्यात आल्या़ तथापि या योजना राबविल्याच जात नसल्यामुळे ग्रामस्थांना अशुद्ध पाणी प्राशन करावे लागत आहे. तालुक्यात अनेक गावांत पाणी पुरवठा योजना कार्यान्वित आहे़ हातपंप, सार्वजनिक विहिरी, ट्युबवेल यातूनही नागरिकांना पाणी पुरवठा होतो़ पिण्यासाठी वापरण्यात येणारे पाणी पिण्यास योग्य आहे किंवा नाही, यासाठी पाणी तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविणे आवश्यक आहे़ तशा स्पष्ट सूचनाही प्रशासनातर्फे देण्यात आल्या आहेत़ मात्र या सूचनांकडे गंभीरतेने पाहिल्या जात नाही़ स्थानिक प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष केले जाते़ पाणी अशुद्ध आहे हे माहित असूनही बरेचदा पाण्याचे दुसरे कोणतेही स्त्रोत उपलब्ध नसल्यामुळे त्याच पाण्याचा पुरवठा केला जातो़ अनेक गावात फ्लोराइडयुक्त पाणी असून ते पिण्यास अयोग्य आहे़ तरीही ग्रामस्थांना तेच पाणी प्यावे लागत आहे. त्यामुळे अनेकांना हाडांचे आजार झाले आहेत़ सर्वाधिक फ्लोराइडयुक्त पाणी तालुक्यात मंगी (कोलाम पोड) या गावात आहे़ (तालुका प्रतिनिधी)दूषित पाण्याला डॉक्टरांचा दुजोरापाणी ज्या स्त्रोतापासून मिळते त्या विहिरी, हातपंपांजवळ मोठ्या प्रमाणात घाण पसरलेली असते़ त्यामुळे पाणी दूषित होते़ पाण्यात नियमित ब्लिचिंग पावडरही टाकले जात नाही़ त्यामुळे याच दूषित पाण्यामुळे साथीच्या आजारात सतत वाढ होत असल्याचे येथील शासकीय उपजिल्हा रूग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले़ सध्या तालुक्यात साथीच्या आजारांनी जोर पकडला आहे़ दूषित पाण्यामुळे या आजारात सतत वाढ होत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे़ पाण्याचे स्त्रोत स्वच्छ राखण्यासाठी यंत्रणा नाही़ त्यामुळेच ग्रामस्थांना अशुद्ध पाणी प्यावे लागत असून विविध आजारांना तोंड द्यावे लागत आहे़