शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत फ्लेक्स लावल्यास थेट गुन्हा

By admin | Updated: October 18, 2014 02:01 IST

फ्लेक्स, होर्डिंग, बॅनर आदींच्या माध्यमातून शहरातील चौकांचे विद्रूपीकरण करणाऱ्यांवर आता चाप लागणार आहे.

सुरेंद्र राऊत यवतमाळ फ्लेक्स, होर्डिंग, बॅनर आदींच्या माध्यमातून शहरातील चौकांचे विद्रूपीकरण करणाऱ्यांवर आता चाप लागणार आहे. उच्च न्यायालयाने यासंदर्भात शासनाला निर्देश दिले असून गृहविभागाने स्वतंत्र आदेश काढून विनापरवाना फ्लेक्स लावणाऱ्यांच्या विरोधात थेट कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. सार्वजनिक आणि शासकीय मालमत्ते संदर्भात फार पूर्वीपासून महाराष्ट्र प्रिव्हेंशन आॅफ डिसेसमेन्ट आॅफ प्रॉपटी अ‍ॅक्ट आहे. प्रत्यक्षात मात्र या कायदाची अंमलबजावणीच होत नसल्याची याचिका जनहित मंचने राज्य शासनाच्या विरोधात उच्च न्यायालयामध्ये दाखल केली होती. मुबंई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने याबाबत कडक निर्देश दिले असून अनधिकृत फ्लेक्स संदर्भात संबंधितावर गुन्हे दाखल करण्याचा आदेश दिला आहे. शिवाय यासाठी नोडल अधिकारी नेमण्याची शिफारस केली आहे. या आदेशानुसार राज्य शासनाच्या गृह विभागाने स्वतंत्र अध्यादेश काढून नगरपरिषद क्षेत्रात मुख्याधिकारी आणि नगरपरिषद क्षेत्राबाहेर उपविभागीय अधिकारी यांनी नोडल अधिकारी म्हणून नियुुक्ती केली आहे. या अधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी असल्याशिवाय कोणालाही जाहिरात फलक लावता येणार नाही. विशेष म्हणजे या फलकावर परवानगी घेतलेला क्रमांक लावणे आवश्यक आहे. अन्यथा असे फलक लावणाऱ्या विरोधात नोडल अधिकाऱ्याने तोंडी दिलेल्या सूचनेवरूनही थेट कारवाई करण्याचे आदेश पोलीस यंत्रणेला देण्यात आले आहे. याशिवाय गस्तीवर असलेल्या पोलिसांनाही अशा प्रकारचे जाहिरात फलक लावणाऱ्यांवर कारवाई करण्याचा अधिकार देण्यात आला आहे. याबाबत पोलीस आयुक्त आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी सूचना द्यावा असे, निर्देश गृह विभागाकडून देण्यात आले आहे. गृह विभागाच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांनी शुक्रवारी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. तसचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, पंचायत अधिकारी, जिल्हा परिषद प्रशासनालाही निर्देश देण्यात आले आहे. जाहीरातीचे बॅनर, होर्डींग्स, फलक, डीजीटल फ्लेक्स, आर्च लावण्यापूर्वी पूर्वपरवानगी घेणे आवश्यक झाले आहे. अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल.