सिंचनात निकषाचा खोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 11:22 PM2018-03-20T23:22:09+5:302018-03-20T23:22:09+5:30

शेती सिंचनात वाढ होण्याच्या उद्देशाने हाती घेण्यात आलेल्या धडक सिंचन विहीर योजनेच्या यशस्वीतेत निकषाचा खोडा निर्माण झाला आहे.

Digging the criteria of irrigation | सिंचनात निकषाचा खोडा

सिंचनात निकषाचा खोडा

Next
ठळक मुद्देअंतराची अट : नेर तालुक्यातील सरकारी विहिरींचे वांदे

किशोर वंजारी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नेर : शेती सिंचनात वाढ होण्याच्या उद्देशाने हाती घेण्यात आलेल्या धडक सिंचन विहीर योजनेच्या यशस्वीतेत निकषाचा खोडा निर्माण झाला आहे. नेर तालुक्यात सदर योजने अंतर्गत मंजूर झालेल्या ९२ विहीरी रद्द होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शेतकऱ्यांच्या गैरहजेरीत झालेले पंचनामे यामुळेही ९२ लाभार्थी योजनेला मुकण्याची भीती आहे.
नेर तालुक्यासाठी धडक सिंचन योजने अंतर्गत ३०० विहिरी मंजूर झाल्या आहे. यासाठी लाभार्थ्यांची निवड ईश्वरचिठ्ठीने करण्यात आली. २९२ लाभार्थी निवडले गेले. ही प्रक्रिया पूर्ण करण्यापूर्वी योजनेचे निकष पाळले गेले नाही. परिणामी आता ९२ लाभार्थी या योजनेपासून दूर राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे. एका विहिरीपासून दुसऱ्यां विहिरीचे अंतर ५०० फूट असणे आवश्यक आहे. ही बाब प्रशासनातील अधिकाऱ्यांनी पाळली नाही. शेतकऱ्यांनी दाखविलेल्या जागेचे पंचनामेही करण्यात आले. आतामात्र ५०० फूट अंतराचे निकष पुढे आणले आहे. ज्या गावात पाणीपुरवठा नळ योजनेची विहिर आहे तेथून १६५० फूट अंतरावर धडक सिंचन विहिर नसावी हा ही निकष आहे.
लाभार्थी निवडीनंतर निकष पुढे आणले आहे. वास्तविक शेतकºयांनी निश्चित केलेल्या जागेचे पंचनामे करतानाच याबाबीची दक्षता घेणे अपेक्षित होते. निकषाच्या याच बडग्यामुळे उमरठा येथील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील मीना भुसारे यांना मंजूर झालेली विहीर रद्द करण्यात आली आहे. ५०० फुटाच्या आत जागा निश्चित केल्याच्या कारणावरून ही विहीर रद्द करण्यात आली आहे. फत्तापूर येथील हरिहर जवके यांच्या अनुपस्थितीत विहिरीचा पंचनामा करण्यात आला आहे. असे अनेक प्रकार तालुक्यात घडले आहे.
अनेक प्रश्न कायम
धडक सिंचन विहिरीचे लाभार्थी निवडण्यासाठी ५०० फूट अंतराची अट शेतकºयांना आधी का सांगितल्या गेली नाही. एकाचवेळी ९२ लाभार्थी नामंजूर कसे होतात, असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केले जात आहे. बसल्या जागेवर पंचनामे केले गेले हे यावरून स्पष्ट होते. यात योजनेची मात्र वाट लागत आहे.

Web Title: Digging the criteria of irrigation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.