धनसळच्या अल्पवयीन मुलीच्या छेडछाडप्रकरणी गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2019 22:33 IST2019-11-03T22:33:50+5:302019-11-03T22:33:58+5:30

पुसद तालुक्यातील धनसळ येथील रहिवासी असलेल्या मुलाने  एका अल्पवयीन मुलीवर हात धरून छेड काढल्याची घटना घडली.

Dhansal's minor girl charged with molestation | धनसळच्या अल्पवयीन मुलीच्या छेडछाडप्रकरणी गुन्हा दाखल

धनसळच्या अल्पवयीन मुलीच्या छेडछाडप्रकरणी गुन्हा दाखल

यवतमाळ- पुसद तालुक्यातील धनसळ येथील रहिवासी असलेल्या मुलाने  एका अल्पवयीन मुलीवर हात धरून छेड काढल्याची घटना घडली. मुलीच्या परिवारामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. ग्रामीण पोलीस स्टेशनने दिलेल्या माहितीनुसार, 17 वर्षीय अल्पवयीन मुलीने धनसळ येथील सलमान सलामत खान (वय 25 वर्ष ) असे छड काढलेल्या मुलाचे नाव आहे. मुलगी 1 नोव्हेंबरच्या सायंकाळी 4 वाजता गावाबाहेर शौचालयास गेली होती.

शौचानंतर घरी परत जात असताना सलमानने तिचा हात धरून मी तुझ्यावर प्रेम करतो, आपण पळून जाऊ असे सांगत छेड काढण्याचा प्रयत्न करीत असता गावातच राहणारे अल्पवयीन मुलीचे काकाला सर्व घटनेबद्दल माहिती दिली. त्यानंतर मुलीचे काका ने मुलाला व त्यांच्या आईवडिलांना माहिती दिली. त्यानंतर मुलीचे काकाने ग्रामीण पोलीस स्टेशन गाठले आणि 2  नोव्हेंबर रोजी दुपारी तक्रार नोंदवली. तक्रार दिल्यावरून ग्रामीण पोलीस स्टेशनने आरोपी सलमान विरोधात 352 अ, 8, 12सह बाल लैंगिक अत्याचार विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सुरू केला आहे.

Web Title: Dhansal's minor girl charged with molestation