वालधूर येथे धम्म प्रबोधन महोत्सव

By Admin | Updated: May 9, 2016 02:33 IST2016-05-09T02:33:59+5:302016-05-09T02:33:59+5:30

तथागत गौतमबुद्ध जयंती आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती महोत्सवानिमित्त

Dhamma Prabodhan Mahotsav at Walhoor | वालधूर येथे धम्म प्रबोधन महोत्सव

वालधूर येथे धम्म प्रबोधन महोत्सव

यवतमाळ : तथागत गौतमबुद्ध जयंती आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती महोत्सवानिमित्त राळेगाव तालुक्यातील वालधूर येथे धम्म प्रबोधन महोत्सवाचे आयोजन सोमवार ९ मे रोजी सकाळी ७ ते रात्री १० वाजेपर्यंत करण्यात आले आहे.
सकाळी ७ वाजता धम्म ध्वजारोहण प्रा. सुमेधबोधी महास्थभीर यांच्या हस्ते होणार आहे. सकाळी ८ वाजता तथागत गौतम बुद्धांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना, ९ वाजता धम्मदेसना शिबिर त्यानंतर दुपारी ४ वाजता नागपूर येथील स्वरवैभव कलावृंद प्रबोधनात्मक कार्यक्रम सादर करतील. तिसऱ्या सत्रात सायंकाळी ७ वाजता प्रबोधनात्मक व्याख्यान होणार आहे. त्यात मुंबई येथील न्यायाधीश गौतम भरणे, डॉ. मधुकर कासारे, धम्मकवी आचार्य सूर्यकांत भगत, ज्येष्ठ पत्रकार शैलेश पांडे, श्रीपाद अपराजित उपस्थित राहतील. रात्री ८ वाजता धम्मगीतांचा सामना होणार असून मनोज राजा गोसावी अमरावती आणि निशा भगत मुंबई यांच्या हा सामना होणार आहे. उपस्थित राहण्याचे आवाहन प्रेमानंद भेले, मनोहर सावज, सुषमा वाघमारे, बुधा पाटील यांनी केले आहे. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Dhamma Prabodhan Mahotsav at Walhoor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.