शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
3
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
4
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
5
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
6
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
7
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
8
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
9
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
10
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
11
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
12
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
13
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
14
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
15
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
16
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
17
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
18
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
19
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
20
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
Daily Top 2Weekly Top 5

नेर नगरपरिषदेच्या विकास आराखड्याचा तिढा सुटला

By admin | Updated: August 3, 2014 23:38 IST

जिल्ह्यात नव्यानेच उदयास आलेल्या नेर-नबाबपूर नगरपरिषदेचा विकास आराखडा तयार केला जात आहे. यासाठी २०११ मध्येच स्थानिक नियोजन प्राधिकरण स्थापन करण्यात आले.

नेर : जिल्ह्यात नव्यानेच उदयास आलेल्या नेर-नबाबपूर नगरपरिषदेचा विकास आराखडा तयार केला जात आहे. यासाठी २०११ मध्येच स्थानिक नियोजन प्राधिकरण स्थापन करण्यात आले. या प्राधिकरणाला विकास आराखडा सादर करण्यासाठी ४ आॅक्टोबर २०१३ पर्यंतची मुदत देण्यात आली होती. मात्र या कालावधीत आराखडा सादर न झाल्याने नगररचना संचालकांनी स्थानिक नियोजन प्राधिकरणाला हद्दपार केले. या विरोधातच उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती. या प्रकरणी न्यायालयाने अंतिरिम स्थगनादेश दिला आहे. यामुळे शहर विकासाच्या आराखड्याचा तिढा सुटणार आहे. शहराचा सुधारित विकास आराखडा तयार करण्याच्या दृष्टीने नगरपरिषदेच्यावतीने सर्व तांत्रिक बाबींची कार्यपूर्ती करण्याकरिता सहायक संचालक नगररचना यवतमाळ यांची नगररचना अधिकारी म्हणून नगरपरिषदेने नियुक्ती केली. हा आराखडा सादर करण्यासाठी शासनाकडून गरजेनुसार मुदतवाढही मंजूर करून घेतली. नियमानुसार दोन वर्षाच्या आत वाढीव मुदतीच्या म्हणजे ४ आॅक्टोबर २०१३ अगोदर हा विकास आराखडा प्रसिद्ध करणे आवश्यक होते. प्रारूप योजना प्रसिद्धीकरिता नगररचना विभागाने नगरपरिषदेला हस्तांतरित केला. त्यावेळी नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली होती. हा आराखडा प्रसिद्ध करण्याचा अधिकार नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेला आहे. मात्र आचारसंहिता असल्याने सभाच झाली नाही. नगरचना विभागाने या बाबत कोणताही निर्णय व सूचना दिल्या नाही. त्यामुळे आचारसंहिता संपुष्टात येताच नगरपरिषदेने प्रारूप योजना प्रसिद्ध करून आक्षेप मागविले. नगरचना विभागाने प्रस्तावित मुदतवाढीची मंजुरी गृहीत धरून प्राप्त आक्षेपावर निर्णय घेण्याकरिता कलम २८ २ नुसार तज्ज्ञ समितीची संचालकांनी नियुक्ती करून प्रक्रिया पुढे नेली. मात्र संचालकांनी निवडणुकीचा कालावधी ग्राह्य न धरता २४ १ नुसार स्ािनिक विकास योजना प्रक्रियेतून नियोजन प्राधिकरण नगरपरिषदेस हद्दपार केले आणि पुढील कार्यवाही करण्याकरिता अधिकारी नियुक्तीचे आदेश दिले. या अन्यायकारक निर्णयाने नगरपरिषदेच्या अधिकारावर गदा आली. स्थानिकाच्या दृष्टीने असलेली गंभीर बाब होती. या प्रकरणी नगराध्यक्ष पवन जयस्वाल व नगरसेवकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायालयाने या प्रकरणात अंतिरिम स्थगनादेश दिला. या खटल्यात नगरपरिषदेच्यावतीने अ‍ॅड.प्रवीण देशमुख यांनी युक्तिवाद केला. न्यायालयाच्या निकालाने शहर विकासाच्या आराखड्याला गती मिळणार आहे. (तालुका प्रतिनिधी)