शहरं
Join us  
Trending Stories
1
तिढा सुटला, विधान परिषद निवडणुकीतून काँग्रेसची माघार, अंबादास दानवे असतील मविआचे उमेदवार
2
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
3
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! उद्या शेअर बाजारात कामकाज होणार का? ट्रेडिंगपूर्वी चेक करा नवं हॉलिडे कॅलेंडर
4
मोठी बातमी! बच्चू कडू यांनी शिवसेनेचं धनुष्यबाण घेतले हाती; "झेंडा बदलला पण अजेंडा नाही.."
5
रियान परागला मोठा धक्का! ड्रेसिंग रूममध्ये स्मोकिंग केल्याप्रकरणी BCCIने केली कठोर कारवाई
6
खिशात कांदा ठेवल्याने खरोखरच 'उष्णता' लागत नाही का? जाणून घ्या उन्हाळ्यातील या सर्वात मोठ्या दाव्यामागचं वास्तव!
7
माचिसची काडी पेटवली अन् भडका उडाला, सिलेंडरच्या स्फोटात कुटुंबातील ७ जण होरपळले
8
काय म्हणावं आता! लग्नात इतक्या जोरात डीजे वाजवला की १४० कोंबड्या मेल्या; मालक चिडला अन्...
9
Sonam Raghuvanshi : “आम्ही वकील केला नाही, जामीनही नाही, जास्त त्रास दिला तर...”; सोनम रघुवंशीच्या भावाची धमकी
10
कर्ज फेडलं पण आता डूख धरून बसला पाकिस्तान; दुबईचा बदला घेणार, 'या' गर्भश्रीमंतला अटक करण्याची तयारी 
11
पुष्टिपती विनायक जयंती २०२६: नववर्षातील बाप्पाचा पहिला जन्मोत्सव; ‘या’ अवताराची कथा माहितीये का?
12
जिनिलियाने उलगडली 'राजा शिवाजी'च्या निर्मितीमागची गोष्ट; म्हणाली, "तडजोड केली नाही..."
13
सराफा बाजारात सोन्याचा दर किती? दागिने बनवायचे तर..., सोन्या-चांदीच्या किमतींत पुन्हा उसळी...
14
पेट्रोल ना डिझेल; 'या' कंपनीच्या इलेक्ट्रिक गाड्यांना मोठी मागणी, टाटा-महिंद्राला मागे टाकले...
15
$१ ची किंमत ₹९५.२०: डॉलरच्या समोर रुपया धराशाही; पहिल्यांदाच विक्रमी नीचांकी स्तरावर भारतीय चलन
16
अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली
17
‘शिवाजी कोण होता?’ उर्दू आवृत्तीच्या २५ हजारांवर प्रतींची विक्री, पुस्तक पोहोचले पाकिस्तानात
18
९० च्या दशकातील सर्वात सुंदर अभिनेत्री! जिच्या नावाने भारताने पाकिस्तानवर डागलेली मिसाईल
19
स्मार्टफोन जगतात मोठी खळबळ: OnePlus आणि Realme चं मर्जर होणार? पाहा डिटेल्स
20
कोल्हापुरी ब्रँड 'प्राडा'ने स्वीकारला, नवीन चप्पल बाजारात; ३० जणांना इटलीत प्रशिक्षणाची संधी
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय अस्थिरतेतही साधला विकास

By admin | Updated: September 28, 2016 00:41 IST

वारंवार तक्रारी, सत्ताधाऱ्यांचा विरोध, दिला जाणारा त्रास अशा कात्रीत आणि राजकीय अस्थिरतेतही केवळ पाच संचालकांच्या भरवशावर समतोल राखत संस्थेचा विकास साधला.

अभिषेक ठाकरे : घाटंजी बाजार समितीची सभा, शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय झालेघाटंजी : वारंवार तक्रारी, सत्ताधाऱ्यांचा विरोध, दिला जाणारा त्रास अशा कात्रीत आणि राजकीय अस्थिरतेतही केवळ पाच संचालकांच्या भरवशावर समतोल राखत संस्थेचा विकास साधला. पाच वर्षांच्या कार्यकाळात बाजार समितीने विकासाचे अनेक टप्पे गाठले, असे सभापती अभिषेक ठाकरे यांनी आमसभेत सांगितले. यावेळी त्यांनी बाजार समितीच्या विकासाचा लेखाजोखा मांडला. यावेळी मंचावर बल्लू पाटील लोणकर, जितेंद्र मोघे, शंकरराव ठाकरे, संजय इंगळे, मारोती पवार, प्रकाश डंभारे, आशीष लोणकर, रूपेश कल्यमवार, किशोर चवरडोल, रमेश आंबेपवार, नामदेव आडे, अकबर तंवर, विवेक भोयर, गजानन चौधरी, नागोराव कुमरे, रफिकबाबू, निकडे पाटील, अशोक देठे, चंपत आत्राम, तुरपाबाई पुसनाके, विजय कडू, संजय गोडे, माणिक मेश्राम आदी उपस्थित होते. सभापती ठाकरे पुढे म्हणाले, पाच वर्षांपूर्वी पगाराची सोय नसलेली बाजार समिती आज करोडो रुपयांनी नफ्यात आले आहे. एक रुपयाचेही कर्ज संस्थेवर नाही. व्यापाऱ्यांवर कडक कारवाई करणारी ही एकमेव बाजार समिती आहे. शेतकरी हितासाठी अनेक निर्णय घेण्यात आले. त्यात १०० टक्के कापूस खरेदी लिलावाद्वारे करण्याचा निर्णय घेऊन अंमलबजावणीही केली. कापसाचे दर घसरल्यानंतर सीसीआयद्वारा कापूस खरेदी केली. एसएमएस सेवेद्वारे शेतकऱ्यांना दररोजचा दर कळविला जातो. प्रथमच या पाच वर्षात शेतमाल तारण योजना राबविली. जवळपास तीन कोटी रुपये शेतमाल तारण योजनेसाठी तरतूद केली. सद्यस्थितीत वॉल कंपाऊंड, काँक्रिटीकरणाची कामे सुरू आहे, असे त्यांनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी)