नागपूरमध्ये शिकत असलेल्या देवलचा गरबा खेळल्यानंतर मृत्यू ! हायपर ॲसिडिटी व हृदयविकार झटका बनले कारण

By सुरेंद्र राऊत | Updated: September 29, 2025 18:49 IST2025-09-29T18:49:01+5:302025-09-29T18:49:36+5:30

राळेगाव येथे शाेककळा : नागपूर येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात खेळला गरबा

Deval, who was studying in Nagpur, died after playing Garba! Hyper acidity and heart attack were the reasons | नागपूरमध्ये शिकत असलेल्या देवलचा गरबा खेळल्यानंतर मृत्यू ! हायपर ॲसिडिटी व हृदयविकार झटका बनले कारण

Deval, who was studying in Nagpur, died after playing Garba! Hyper acidity and heart attack were the reasons

राळेगाव : येथील विद्यार्थी नागपूर येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात हाेता. तेथे नवरात्रीनिमित्ताने गरबाचे आयाेजन करण्यात आले हाेते. २६ सप्टेंबरच्या रात्री देवल विठ्ठलराव झाडे (२३, रा. गणेशनगर, राळेगाव) हा गरबा खेळून नागपूर येथील फ्रेंड्स कॉलनी परिसरातील घरी आला. त्याला रात्री १२ वाजता हृदयविकाराचा तीव्र झटका आला. यातच त्याचा मृत्यू झाला. या घटनेने राळेगाव येथे शाेककळा पसरली आहे.

देवलचा हायपर ॲसिडिटी व हृदयविकार झटका झाल्याने मृत्यू झाल्याची डॉक्टरांनी सांगितले. देवल झाडे हा गुरुनानक कॉलेज ऑफ टेक्नॉलॉजी नागपूर येथील बीई कॉम्प्युटर सायन्स अंतिम वर्षाचा विद्यार्थी होता. शेवटचे वर्ष असल्यामुळे त्याने मोठा आनंदाने कॉलेजने आयोजित केलेल्या दांडिया कार्यक्रमात सहभाग घेतला. गरबा खेळण्याासाठी त्याने पारंपरिक ड्रेससुद्धा विकत घेतला होता. शुक्रवारी रात्री मित्रांसोबत दांडिया खेळल्यानंतर तो घरी गेला. त्याला अस्वस्थ वाटू लागल्याने मित्रांनी त्याला लगेच खाजगी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर याची माहिती राळेगाव येथे आई-वडिलांना दिली. मुलाचा मृत्यू झाल्याचे ऐकून झाडे कुटुंबीयांवर दु:खाचा डाेंगर काेसळला.


 

Web Title : नागपुर: गरबा खेलने के बाद छात्र की मौत, हाइपरएसिडिटी, हृदयघात की आशंका।

Web Summary : नागपुर में गरबा खेलने के बाद देवल झाडे नामक एक इंजीनियरिंग छात्र की हृदयघात से मौत हो गई। हाइपरएसिडिटी भी एक कारण हो सकता है। रालेगांव का मूल निवासी 23 वर्ष का था।

Web Title : Nagpur Student Dies After Garba: Hyperacidity, Heart Attack Suspected.

Web Summary : Deval Zade, a Nagpur engineering student, died of a suspected heart attack after playing Garba. Hyperacidity may have contributed. The Raigaon native was 23.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.