शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
9
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
10
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
11
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
12
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
13
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
14
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
15
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
16
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
17
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
18
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
19
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
20
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार

महिलांनी कष्टाने उभी केलेली शेती उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2020 5:00 AM

शासनाच्या हाकेला ओ देत रुढा गावातील महिलांनी शेवगा शेती करुन २६५ वृक्षाची जोपासना केली. मोठ्या कष्टाने त्यांनी शेतीतून उत्पन्नाचे साधन निर्माण केले होते. पदरमोड करुन २५ हजारांच्या आसपास खर्च केला. शेतीतून चार पैसे पदरात पडतील, अशी आशा निर्माण झाली. परंतु त्यांचं हिरवं स्वप्न धुळीस मिळालं.

ठळक मुद्देदारुबंदीच्या भूमिकेने केला घात : रुढा गावातील घटनेने चीड, शेवग्याची झाडे अज्ञातांनी कापून फेकली

गजानन अक्कलवार ।लोकमत न्यूज नेटवर्ककळंब : गावखेड्यातील दहा महिला एकत्र आल्या. सामूहिक शेतीचा संकल्प त्यांनी केला. प्रत्येकीने तळपत्या उन्हात भविष्याची सोनेरी स्वप्न पाहून मातीत घाम गाळला. त्यातून शेवगा शेती केली. परंतु दारुविके्रत्यांनी त्यांची शेतीच उद्ध्वस्त केली. हा संतापजनक प्रकार रुढा गावात सोमवारी रात्री घडला.शासनाच्या हाकेला ओ देत रुढा गावातील महिलांनी शेवगा शेती करुन २६५ वृक्षाची जोपासना केली. मोठ्या कष्टाने त्यांनी शेतीतून उत्पन्नाचे साधन निर्माण केले होते. पदरमोड करुन २५ हजारांच्या आसपास खर्च केला. शेतीतून चार पैसे पदरात पडतील, अशी आशा निर्माण झाली. परंतु त्यांचं हिरवं स्वप्न धुळीस मिळालं.या चीड आणणाऱ्या प्रकाराला सूडबुध्दीची किनार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावातील महिलांनी प्रामाणिकपणे जनजागृतीचे कार्य केले. यात जागृती बचत गटाच्या महिलाही मागे नव्हत्या. गावात कुठलाही धोका होऊ नये, यासाठी महिलांच्या पुढाकारात दारूबंदीची घोषणा करण्यात आली. गावासोबतच बाहेरगावचे पण लोकं रुढामध्ये दारु पिण्यासाठी यायचे. त्यामुळे गावातील नागरिकांना कोरोना होऊ नये, यासाठी दारुबंदी केली.परंतु विनंती करूनही कोणी दारुविक्री थांबविली नाही. त्यामुळे महिलांनी स्वत: दारुविक्री बंद पाडली. पोलिीसांना दारू पकडून दिली. याचाच राग म्हणून दारुविके्रत्यांनी महिलांच्या सामूहिक शेतातील पाणी देणाºया मोटारचे पाईप कापले. पण महिलाही खचून गेल्या नाही. त्यांनी हार न मानता हिमतीने डोक्यावरुन गुंडांनी पाणी दिले. महिला असूनही हार मानायला तयार नसल्याने दारुविक्रेते आणखी बैचेन झाले. आता तर त्यांची चक्क शेवग्याची झाडेच कापून टाकली. यात शेताचे मोठे आर्थिक नुकसान झाले. या प्रकारामुळे महिलांना मोठा धक्का बसला. या घटनेची तक्रार अश्विनी घोंगडे यांनी कळंब पोलिसात केली. प्रकरणी अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ग्रामीण महिलांच्या विकासाला खीळकष्टातून पुढे जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या या ग्रामीण महिलांना उभारी देण्याचे काम करण्याऐवजी त्यांचे पंख छाटण्याचे पाप या काही लोकांनी केले. येणाºया काळात या महिला शेतीपूरक इतर व्यवसायातही यशस्वी ठरु शकल्या असत्या. परंतु त्यांना उभारी न देता मागे खेचण्याचे काम करण्यात आले. आता या महिला पुरत्या खचून गेल्या आहे. त्यांना खऱ्या अर्थाने आता आर्थिक मदतीची गरज आहे.

टॅग्स :liquor banदारूबंदी