शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
4
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
5
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
6
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
7
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
8
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
9
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
10
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
11
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
12
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
13
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
14
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
15
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
16
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
17
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
18
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
19
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
20
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
Daily Top 2Weekly Top 5

दोन युवकांच्या संशयास्पद मृत्यूचे प्रात्यक्षिक

By admin | Updated: September 18, 2014 00:07 IST

दहा वर्षांपूर्वीच्या दोन युवकांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी दोन शिपायांमार्फत टायमर लावून प्रात्यक्षिक करवून घेतले. पोलीस आयुक्त थेट दत्त चौकातील एका कृषी केंद्रात चौकशीसाठी धडकले.

यवतमाळ : दहा वर्षांपूर्वीच्या दोन युवकांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी दोन शिपायांमार्फत टायमर लावून प्रात्यक्षिक करवून घेतले. पोलीस आयुक्त थेट दत्त चौकातील एका कृषी केंद्रात चौकशीसाठी धडकले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून औरंगाबादचे पोलीस आयुक्त राजेंद्रसिंह ही फेरचौकशी करीत आहेत. यात याचिकाकर्ते शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख शैलेश ठाकूर व प्रकरणाशी संंबंधित ८८ जणांना यापूर्वीच साक्ष देण्यासाठी समन्स जारी करण्यात आले होते. त्यानुसार तत्कालीन शहर ठाणेदार अनंत थोरात, फौजदार सुधाकर अंभोरे यांच्यासह पोलीस खात्याबाहेरील साक्षीदारांची गेली दोन दिवस बयाणे नोंदविण्यात आली. बयाणे नोंदविताना आयुक्त राजेंद्रसिंह यांनी घटनेनंतर त्यावेळी स्थानिक पोलिसांनी आणि त्यानंतर सीआयडीने नोंदविलेली बयाणे साक्षीदारांना वाचून दाखविली. शिवाय त्यावेळी दिलेले जबाब बरोबर आहे का, त्यात काही सुधारणा करायची आहे का, असे विविध बारकावे तपासून त्यांनी फेरबयाणे घेतली. यापूर्वी झालेल्या पोलीस तपासात सुरेश सोनकुसरे आणि अजय मोहिते या दोन युवकांनी दत्त चौकातील एका कृषी केंद्रातून विषारी औषध खरेदी केले. तसेच तेथेच ते प्राशन करून दोघेही चालत पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात आले. काही वेळाने स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यालयापुढे त्यांचा मृत्यू झाल्याचे म्हटले होते. दत्त चौकात विष प्राशन करून पाच मिनिटांत पायदळ पोहोचता येते का, याची खातरजमा करण्यासाठी दोन पोलीस कर्मचाऱ्यांकरवी प्रात्यक्षिक करवून घेतले. टायमरनुसार पोलीस शिपाई पाच मिनिटात अधीक्षक कार्यालयात पोहोचू शकले नाही. तपासात उणीवा राहू नये म्हणून स्थानिक गुन्हे शाखेचे कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारातील चहा टपरीच्या जागेची त्यांनी बारकाईने पाहणी केली. त्यानंतर थेट दत्त चौकातील कृषी केंद्रात जाऊन चौकशी केल्याचे पोलिसातून सांगण्यात आले. आतापर्यंत चौकशीत ५० वर पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आले. (स्थानिक प्रतिनिधी)