शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
4
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
5
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
6
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
7
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
8
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
9
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
10
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
11
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
12
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
13
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
14
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
15
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
16
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
17
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
18
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
19
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
20
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
Daily Top 2Weekly Top 5

६३ लाखांचा गंडा घालणारे दिल्लीचे ठग जेरबंद

By admin | Updated: March 1, 2016 01:59 IST

विमा कंपनीत जमा रकमेच्या कमिशनचा थेट लाभ पॉलिसीधारकाला देण्याचे आमिष देऊन यवतमाळातील एका ....

दोन वर्षांपूर्वीचा गुन्हा : यवतमाळात फसवणूक, ११ बँक खाते गोठविले यवतमाळ : विमा कंपनीत जमा रकमेच्या कमिशनचा थेट लाभ पॉलिसीधारकाला देण्याचे आमिष देऊन यवतमाळातील एका व्यावसायिकाला ६३ लाखांचा गंडा घालणाऱ्या दिल्ली येथील दोन ठगांना यवतमाळ पोलिसांनी अटक केली. दोन वर्षापूर्वी घडलेल्या या गुन्ह्याचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले.मधुकर देवराव रानडे (७३) रा. दहिवलकर ले-आऊट यवतमाळ असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर सचिन विनोदकुमार गोयल (२८) रा. सीताराम बाजार दिल्ली, रतीपाल सुरेशकुमार चौधरी (३०) रा. दिल्ली असे अटकेतील दोन ठगांचे नाव असून इतर दोन जण पसार आहे. यवतमाळातील रानडे यांना या चौघांनी फोन करून विमा पॉलिसीबद्दल विस्तृत माहिती दिली. विमा पॉलिसीधारकाच्या लाभातूनच एजंटचे कमिशन कापण्यात येते. त्यामुळे मोठी रक्कम वाया जाते. हा प्रकार टाळून थेट पॉलिसीधारकाला कमिशन देण्याची योजना असल्याचे त्यांनी सांगितले. त्यासाठी होणाऱ्या प्रक्रियेवर खर्च येतो. ती रक्कम आमच्या खात्यात जमा करा असे सांगितले. याला भुलून रानडे यांनी आरलाईफ या कंपनीच्या नावाने असलेल्या खात्यात वेळोवेळी पैसे जमा केले. कधी त्यांनी धनादेश तर कधी रोख रक्कम आरोपीच्या खात्यात टाकली. मात्र काही दिवसातच आपली फसवणूक होत असल्याचे रानडे यांच्या लक्षात आले. १४ जुलै २०१४ रोजी त्यांनी वडगाव रोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तेव्हा त्यांच्याकडे आरोपीकडून आलेला फोन क्रमांक आणि बँक खाते क्रमांक इतकीच माहिती होती. पोलीस तपासही पुढे सरकला नाही. अखेर प्रलंबित हे प्रकरण वर्षभरापूर्वी स्थानिक गुन्हे शाखेकडे तपासासाठी देण्यात आले. उपलब्ध माहितीवरून शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सुगत पुंडगे, सचिन हुमने, साजीद खान, आशिष चौबे, कविश वाळेकर यांनी आठ महिन्यापूर्वी तपासाला सुरुवात केली. यात पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह, अपर पोलीस अधीक्षक काकासाहेब डोळे, एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी विशेष मार्गदर्शन केले. दिल्ली आरोपींच्या शोधात गेलेल्या पथकाला दिल्ली पोलिसांचे सहकार्य मिळाले. दरम्यान १९ फेब्रुवारीला पहिला आरोपी सचिन विनोदकुमार गोयल आणि २६ फेब्रुवारीला दुसरा आरोपी रतीपाल सुरेशकुमार चौधरी याला अटक करण्यात यश आले. या प्रकरणातील आणखी दोन आरोपी पसार आहे. यवतमाळात फसवणूक झालेल्या प्रकरणाचा दोन वर्षानंतर छडा लागून आरोपी जेरबंद झाले आणखी दोघांना लवकरच अटक होणार आहे. (कार्यालय प्रतिनिधी) फसवणुकीच्या रकमेतून परदेशात मौजमजा दिल्ली येथून अटक केलेल्या सचिन गोयल आणि रतिपाल चौधरी व त्यांच्या दोन सहकाऱ्यांनी फसवणुकीतून मिळविलेल्या रकमेतून परदेशात मौजमजा केल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. बँकॉक, उझबेकीस्थान, दुबई या ठिकाणी जाऊन त्यांनी हा पैसा उधळला. दिल्लीत पोलिसांनी या महाठगांना अटक केल्यानंतर त्यांची विविध बँकेतील ११ खाती सील केले आहे. त्यांच्याकडून आठ लाख रुपये किंमतीच्या दोन कार जप्त करण्यात आल्या. रोख रक्कम मात्र पोलिसांच्या हाती लागली नाही. या दोघांना यवतमाळ पोलिसांनी सोमवारी न्यायालयापुढे हजर केले. त्यावेळी त्यांना ४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली. या आरोपींकडून इतर गुन्हेही उघडकीस येण्याची शक्यता आहे.