जिल्हा परिषदेच्या सीईओपदी दीपक सिंगला

By Admin | Updated: April 29, 2016 02:28 IST2016-04-29T02:28:42+5:302016-04-29T02:28:42+5:30

येथील जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी थेट आयएएस दीपक सिंगला यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Deepak Singh as CEO of Zilla Parishad | जिल्हा परिषदेच्या सीईओपदी दीपक सिंगला

जिल्हा परिषदेच्या सीईओपदी दीपक सिंगला

यवतमाळ : येथील जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी थेट आयएएस दीपक सिंगला यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
विद्यमान सीईओ मल्लिनाथ कलशेट्टी यांची आदिवासी बहुल नंदूरबार जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आता कलशेट्टी यांच्या जागेवर भारतीय प्रशासकीय सेवेचे तरुण अधिकारी दीपक सिंगला यांना आणण्यात आले आहे. सिंगला यांनी आपला आयएएसचा परिविक्षाधीन कार्यकाळ यवतमाळ जिल्ह्यातच पूर्ण केला आहे. ते उमरखेड येथे उपविभागीय महसूल अधिकारी म्हणून कार्यरत होते. हा कार्यकाळ संपत असतानाच त्यांना जिल्हा परिषदेच्या सीईओपदी नियुक्ती देण्यात आली. (जिल्हा प्रतिनिधी)

‘आयपीएस’ची संधी हुकली
शासनाने ‘आयपीएस’ झालेल्या नऊ तरुण अधिकाऱ्यांची नुकतीच राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी नियुक्ती केली. यातील एक ‘आयपीएस’ यवतमाळला अपर पोलीस अधीक्षक म्हणून देण्याचे ठरले होते. मात्र याची कुणकुण लागताच ‘साहेबांनी’ ऐनवेळी मंत्रालयात धाव घेतल्याने जिल्ह्याला ‘आयपीएस’ अ‍ॅडिशनल एसपी मिळण्याची संधी हुकल्याची चर्चा पोलीस दलात आहे.

Web Title: Deepak Singh as CEO of Zilla Parishad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.