शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
3
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
4
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
5
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
6
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
7
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
8
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
9
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
10
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
11
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
12
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
13
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
14
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
15
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
16
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
17
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
18
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
19
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
20
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
Daily Top 2Weekly Top 5

बंदी भागात मरणयातना

By admin | Updated: July 16, 2014 00:29 IST

पैनगंगा अभयारण्यातील बंदी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परिसरातील गावांना पावसाळा आला की मरणयातना सोसाव्या लागतात. स्वातंत्र्यानंतर या भागातील रस्त्यांची दुरुस्ती झाली नाही

रस्ते नादुरुस्त : पावसाळ्यात तुटतो गावांचा संपर्कअविनाश खंदारे ल्ल उमरखेड (कुपटी)पैनगंगा अभयारण्यातील बंदी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परिसरातील गावांना पावसाळा आला की मरणयातना सोसाव्या लागतात. स्वातंत्र्यानंतर या भागातील रस्त्यांची दुरुस्ती झाली नाही तर पूलही खिळखिळे झाले आहेत. यामुळे पावसाळ्यात या गावांचा संपर्क तुटतो. सार्वजनिक बांधकाम विभाग अभयारण्याच्या नियमांचे कारण पुढे करून दुरुस्तीत टाळाटाळ करीत आहे. उमरखेड तालुक्यात पैनगंगा नदीतिरावर पैनगंगा अभयारण्य आहे. या अभयारण्यात ६० किलोमीटर चौरस परिसरात पसरलेल्या भागाला बंदी भाग म्हणून ओळखले जाते. जवराळा, थेरडी, डोंगरगाव, सोनदाभी, गाडी, बोरी, खरबीसह अनेक गावे आहे. या गावांना जोडण्यासाठी कधीकाळी सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ते केले होते. मात्र दुरुस्तीचे नावच कुणी घेत नाही. २० वर्षांपासून सार्वजनिक बांधकाम विभाग अभयारण्याच्या जाचक कायद्याचे कारण पुढे करते. उमरखेड ते किनवट जाणारा रस्ता जेवलीपासून किनवटपर्यंत पूर्णत: उखडला आहे. या रस्त्यावर दुरुस्ती केली जात नाही. आणि नवीन रस्त्यासाठी प्रस्ताव तयार होत नाही. हा रस्ता पैनगंगा अभयारण्यातील गावांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या रस्त्यावरून किनवट अथवा उमरखेड आणि पुढे जावे लागते. रस्ता नादुरुस्त असल्याने नागरिकांना मरणयातना सहन कराव्या लागतात. गेल्या २० वर्षांपासून नागरिक रस्त्यासाठी लढा देत आहे. जेवली ते किनवट या रस्त्यावर जनावरांनाही चालता येत नाही. वाहन कसे जात असेल, हे त्या चालकांनाच माहीत. या मार्गावरील पूल जीर्ण होऊन खचले आहेत. काही पूल गाळ अडकल्याने जमिनीबरोबर आले आहेत. अशा स्थितीतही नागरिक जीव धोक्यात घालून प्रवास करतात. पावसाळ्यात नाल्याला पूर आला तरी तासनतास वाहतूक ठप्प होते. अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी बाहेरगावी जातात. त्यांनाही या रस्त्याचा त्रास सहन करावा लागतो.