बापरे.. एकाच दिवशी आढळले तीन ठिकाणी कुजलेल्या अवस्थेत मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2023 17:14 IST2023-03-06T17:11:40+5:302023-03-06T17:14:55+5:30
अज्ञात आरोपी विरुद्ध पोलिसांनी केला खुनाचा गुन्हा दाखल

बापरे.. एकाच दिवशी आढळले तीन ठिकाणी कुजलेल्या अवस्थेत मृतदेह
उमरखेड (यवतमाळ) : येथील बाळदी रोडवरील आयटीआय कॉलेजच्यामागे एका तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत झुडपात मृतदेह आढळून आला. ही घटना रविवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
गोपाल सुधाकर मिरासे (२५), रा. बाळदी, असे ओळख पटलेल्या मृताचे नाव आहे. १ मार्चपासून गोपाल बेपत्ता होता, अशी माहिती गावकऱ्यांकडून मिळाली. तो १ मार्च रोजी बाळदी येथून गेला होता. नंतर परत आलाच नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी पोलिस स्टेशन गाठून गोपाल बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. रविवारी आयटीआय कॉलेजच्या पाठीमागे त्याचा मृतदेहच आढळून आला.
परिसरातील एक व्यक्ती शौचास गेला असताना झुडपातून दुर्गंधी येत होती. याबाबत त्या व्यक्तीने नागरिकांनी माहिती दिली. त्यांनी पोलिसांना माहिती दिली. लोच ठाणेदार अमोल माळवे यांनी ताफ्यासह घटनास्थळ गाठले. तेव्हा झुडपात कुजलेला मृतदेह आढळून आला. पोलिसांनी गावकऱ्यांच्या सहकार्याने ओळख पटविली असता मृतदेह गोपाल मिरासेचा असल्याचे निष्पन्न झाले.गोपालचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार अमोल माळवे, सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत देशमुख, पोलीस उपनिरीक्षक सी.एम. चौधरी व अमोल राठोड करीत आहे.
नांदुरा येथे अज्ञाताला मृतदेह आढळला
बाभुळगाव येथून चार किमी अंतरावर असलेल्या नांदुरा (पुलाचे) येथे शनिवारी ३५ वर्ष वयोगटातील अनोळखी इसमाचा मृतदेह अज्ञात व्यक्तीचा मृतदेह असल्याची माहिती नांदुरा येथील युवराज मधुकर महानूर यांनी बाभूळगाव पोलिसांना दिली. मृतदेहाची ओळख पटविण्याचे आवाहन करण्यात आले.
रस्त्याच्या कडेला आढळलेला मृतदेह कुणाचा?
सोनखास : वय अंदाजे ६० वर्ष, अंगात पांढरे चौकड्याचे शर्ट, काळी पॅन्ट अशा वर्णनाचा मृतदेह कुणाचा याचा शोध शोध लाडखेड पोलिस घेत आहेत. सोनवाढोणा शिवारात रोपवाटिकेजवळ रविवारी सकाळी ६ वाजण्याच्या मृतदेहावर ठिकठिकाणी जखमा आढळून आल्या. या विषयीची माहिती नागरिकांनी गावात येऊन दिली. सोनवाढोणा येथील पोलिस पाटील पुष्पपन भगत यांनी लाडखेड पोलिसांनी कळविले.