शहरं
Join us  
Trending Stories
1
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
2
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
3
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
4
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
5
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
6
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
7
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
8
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
9
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
10
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
11
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
12
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
13
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
14
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
15
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
16
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
17
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
18
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
19
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
20
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

दारव्हा शहर बनले कोरोनाचे ‘हॉट स्पॉट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 05:00 IST

मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ज्या पद्धतीने कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी नियोजन केले, त्यामुळे आता सर्व फोकस येथेचे राहील, हे नक्की झाले. तसेच स्थानिक यंत्रणासुद्धा मैदानात उतरली. उपाययोजना सुरु करण्यात आल्या. प्रथम बुलडाणा, मंगरुळपीर आणि कारंजा कनेक्शनमधून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या काहींचा रिपोर्ट निगेटिव्ह आला.

ठळक मुद्देरुग्णसंख्या, मृत्यूदरात वाढ : जिल्हा प्रशासनाचा फोकस शहरावर, स्थानिक यंत्रणाही उपाययोजनांसाठी मैदानात

मुकेश इंगोले ।लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आणि वाढलेला मृत्यू दर बघता हॉट स्पॉट बनलेल्या दारव्हा शहराकडे जिल्हा प्रशासनाने सर्व लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे या आजाराची साखळी तोडण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ज्या पद्धतीने कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी नियोजन केले, त्यामुळे आता सर्व फोकस येथेचे राहील, हे नक्की झाले. तसेच स्थानिक यंत्रणासुद्धा मैदानात उतरली. उपाययोजना सुरु करण्यात आल्या. प्रथम बुलडाणा, मंगरुळपीर आणि कारंजा कनेक्शनमधून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या काहींचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. नंतर मात्र मुंबईवरुन कुटुंबासह गावी परतलेला व्यक्ती, ईनामदारपुरा परिसरातील महिला व तिच्या संपर्कात आलेले १५, शिवाजीनगरमधील व्यक्ती, पोलीस कर्मचारी, खाटीकपुरातील व्यक्ती, ईनामदारपुरा, टीळकवाडी व खाटीकपुरा परीसरातील दोन महिला व एका पुरुषाचा मृत्यू झाला. त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. यामुळे दारव्हा शहराची एकूण रुग्ण संख्या २१ वर पोहोचली आहे.अचानक वाढलेले रुग्ण आणि मृत्यू दर बघता प्रशासन हादरून गेले. शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे तत्काळ उपाययोजना सुरू झाल्या. शहरवासीयांनी स्वयंस्फूर्तीने सात दिवसांचा जनता कर्फ्यू लागू केला. या पार्श्वभूमीवर मंगळवारी जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह येथे भेट देऊन संपूर्ण मोर्चा आपल्या हाती घेत नियोजन केले. नंतर उपाययोजनांना प्रचंड वेग आला. शहरात आता चार प्रतिबंधित क्षेत्र आहे. घरोघरी आरोग्य सर्वे सुरु करण्यात आला. या क्षेत्रात जंतुनाशकाची फवारणी, अत्यावश्यक सुविधा पुरविण्यात येईल. जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक खुद्द १४ दिवस शहराला भेट देतील. अपर जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा आरोग्य अधिकारी या ठिकाणी तळ ठोकून आहे.शहरासाठी एका तालुका आरोग्य अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली. शहरातील व्यापारी प्रतिष्ठाने बंद आहे. रस्त्यावरील अनावश्यक वाहनांची वर्दळ कमी करण्यासाठी जिल्हा वाहतूक शाखेच्या चमूला पाचारण करण्यात आले.शहरात तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला. याप्रमाणे कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे.प्रशासनाला नागरिकांच्या सहकार्याची आवश्यकताकोरोनाला शहरातून १५ दिवसांत हद्दपार करण्याचा निर्धार जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. मात्र त्यासाठी प्रशासनाला नागरिकांचे सहकार्य आवश्यक आहे. सध्या कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरू असून शेकडोच्या संख्येने नागरिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील निघतील, असा अंदाज आहे. मात्र अनेकांची संस्थात्मक विलगीकरणात येण्याची मानसिकता नाही. त्यामुळे कोरोनाची साखळी कशी तुटेल, असा प्रश्न आहे. उपविभागीय अधिकारी इब्राहीम चौधरी, उपविभागीय पोलीस अधिकारी उदयसिंह चंदेल, तहसीलदार संजय जाधव, ठाणेदार मनोज केदारे, मुख्याधिकारी धीरज गोहाड, गटविकास अधिकारी राजीव शिंदे, उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.गजानन खरोडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.के.सी. बानोत यांच्यासह नगरपरिषद, पोलीस महसूल, आरोग्य व विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी स्वत:चा जिव धोक्यात घालून दिवस-रात्र परिश्रम घेत आहे. जिल्हा प्रशासनाने आपले लक्ष शहरावर केंद्रित केले. नागरिकांनी प्रशासनाच्या सूचना पाळाव्यात, असे आवाहन केले आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या