शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

दारू पिऊन ट्रॅव्हल्स पळविणाऱ्या चालकावर अखेर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2023 12:14 IST

२५ जण जीव मुठीत घेऊन करीत होते प्रवास : मदत मागितल्यानंतर पोलिसांनी दारव्ह्यामध्ये ट्रॅव्हल्स अडविली

यवतमाळ : समृद्धी महामार्गावर नुकताच ट्रॅव्हल्स अपघात होवून २५ जणांचा कोळसा झाला. तरीही ट्रॅव्हल्सचालक व मालक सुधारण्यास तयार नाहीत. बुधवारी रात्री पुणे येथून नागपूरसाठी २५ प्रवासी घेऊन निघालेल्या दशमेश ट्रॅव्हल्सचा चालक मद्यधुंद अवस्थेत सुसाट वाहन हाकत होता. एका प्रवाशाने दारव्हा ठाणेदाराचा मोबाइल नंबर मिळवून त्यांना आपबिती सांगितली. त्यानंतर ही ट्रॅव्हल्स दारव्हा येथे गुरुवारी दुपारी ३.४५ वाजता अडविण्यात आली. तेव्हा २५ प्रवाशांचा जीव भांड्यात पडला. याप्रकरणी चालक, मालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

नागपूर-पुणे या मार्गावर जगतारसिंग सैनी यांच्या मालकीची एमएच-४०- सीएम-१११५ क्रमांकाची ट्रॅव्हल्स दशमेश नावाने प्रवास करते. बुधवारी रात्री पुणे येथून २५ प्रवासी घेऊन ही ट्रॅव्हल्स नागपूरकडे निघाली. काही अंतर पार केल्यानंतर ट्रॅव्हल्सचालक बेदरकारपणे वाहन हाकत असल्याचे प्रवाशांच्या लक्षात आले. नुकतीच समृद्धी महामार्गावरील पिंपळखुटा येथील अपघाताची घटना घडली आहे. त्यामुळे प्रवाशाच्या मनात भीती निर्माण झाली आहे. त्यात दशमेश ट्रॅव्हल्सचा चालक काही ऐकण्यास तयार नव्हता. या संकटातून सुटका कशी करायची अशी धडपड प्रवाशांची सुरू होती.

या प्रवाशांनी दारव्हा ठाणेदार विलास कुलकर्णी यांचा मोबाइल क्रमांक मिळवून त्यांना संपर्क केला. ट्रॅव्हल्स चालकाच्या कृत्याची व जीव धोक्यात असल्याची माहिती दिली. त्यानंतर तत्काळ बसस्थानकासमोर ही ट्रॅव्हल्स पोलिसांनी थांबविली. चालक अमृत प्रल्हाद थेर (४६, रा. माहुली ता. दारव्हा) याला ताब्यात घेतले. तो मद्यधुंद अवस्थेत होता. त्याची तत्काळ वैद्यकीय तपासणी करण्यात आली. रक्ताचे नमुनेही तपासणीला पाठविण्यात आले. ट्रॅव्हल्स चालकावर कलम २७९ भादंविसह कलम १८५ मोटार वाहन अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला.

खासगी ट्रॅव्हल्सच्या मद्यधुंद चालकामुळे प्रवाशांचा जीव टांगणीला

यासोबतच ट्रॅव्हल्सची सुद्धा आरटीओंकडून तपासणी केली जाणार आहे. त्यांच्या अहवालानंतर आणखी पुढील कारवाई प्रस्तावित केली जाईल, असे ठाणेदार विलास कुलकर्णी यांनी सांगितले. ट्रॅव्हल्स मालकावरही कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी प्रवाशांनी केली.

ट्रॅव्हल्स मालकावरही कारवाईचे संकेत 

दिवसाचा प्रवास असल्याने मद्यधुंद चालकाचा प्रताप प्रवाशांच्या लक्षात आला. रात्री जाणाऱ्या ट्रॅव्हल्समध्ये मात्र प्रवासी बिनधास्तपणे झोपी जातात. ट्रॅव्हल्समालक कुठलीही पडताळणी न करता चालकांना ट्रॅव्हल्स सोपवितात. त्यात प्रवाशांचा जीव धोक्यात घातला जातो. असे प्रकार सातत्याने घडत आहे. यवतमाळातील चिंतामणी ट्रॅव्हल्स अपघातात १२ प्रवासी, तर विदर्भ ट्रॅव्हल्सच्या अपघातात २५ जणांचा होरपळून मृत्यू झाला. त्यानंतरही यात सुधारणा झालेली नाही. हप्तेखोरीतून ट्रॅव्ह- ल्समालकांनी यंत्रणेला दावणीला बांधल्याचा आरोप होत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीroad transportरस्ते वाहतूकYavatmalयवतमाळ