कापूस कवडीमोल, ‘तीळ’ खातेय भाव

By Admin | Updated: December 27, 2014 02:40 IST2014-12-27T02:40:43+5:302014-12-27T02:40:43+5:30

शेतकऱ्याच्या घरात माल नसला की बाजारात त्या मालाला किंमत असते. शेतकऱ्याला माल आला की, बाजारातील भाव उतरला असे ग्रामीण भागातील शेतकरी बांधव सांगतात.

Cotton Cuddamol, 'Sesame' Account | कापूस कवडीमोल, ‘तीळ’ खातेय भाव

कापूस कवडीमोल, ‘तीळ’ खातेय भाव

पुसद : शेतकऱ्याच्या घरात माल नसला की बाजारात त्या मालाला किंमत असते. शेतकऱ्याला माल आला की, बाजारातील भाव उतरला असे ग्रामीण भागातील शेतकरी बांधव सांगतात. परंतु गेल्या वर्षभरापासून तिळाचे भाव गगनाला भिडले असून आवक देखील नाही. १० ते ११ हजार रुपये क्ंिवटलच्या भावाने ‘तिळाची’ खरेदी पुसद कृषी उत्पन्न बाजार समिती झाली आहे.
पुसद म्हटले म्हणजे डोळ्यासमोर येते पांढरे सोने, परंतु हे पांढरे सोने आता कवडीमोल भावाने शेतकऱ्यांना विक्री करावे लागत आहे. उत्पादन खर्च झाला आणि कापसाला भाव नाही अशी परिस्थिती कापूस उत्पादक शेतकऱ्यांची आहे. पुसद तालुक्यातील चार हेक्टर क्षेत्रावर तिळाची लागवड झाली होती. हवामानावर तिळाचे उत्पादन आधारित असते.
कीड मोठ्या प्रमाणात तीळ पिकाला लागले. उत्पन्न कमी होत असल्यामुळे तिळाची लागवड कुणीही करण्यासाठी फारसे धजावत नाही. परंतु आता गेल्या वर्षभरापासून तिळाने चांगला भाव घेतला आहे. गेल्या वर्षी सात ते आठ हजार क्ंिवटलने तिळाची विक्री झाली. यावर्षी पुसदच्या बाजारात तिळाचा भाव १० हजार ५०० रुपये भावाने तीळ खरेदी झाली. अवकाळी पावसामुळे या तीळ पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. कधी हवामानामुळे देखील नुकसान होते. म्हणून तीळ लागवडचे प्रमाण कमी होत चालले आहे.
पंजाबराव कृषी विद्यापीठाने उन्हाळी लागवडीसाठी तिळाचे अनेक वाण विकसित केलेले आहे. शेतकऱ्यांनी पिकांचा फेर पालट म्हणून जर तिळाची लागवड उन्हाळ्यात केली तर उत्पन्न होऊ शकते आणि असा भाव राहिला तर बऱ्यापैकी नफा मिळू शकेल. परंतु शेवटी हवामानावर अवलंबून हे तिळाचे उत्पन्न आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Cotton Cuddamol, 'Sesame' Account

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.