CoronaVirus यवतमाळला आणखी एक कोरोनाग्रस्त सापडला; एकूण रुग्णसंख्या ८१ वर
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2020 22:32 IST2020-05-03T22:31:33+5:302020-05-03T22:32:09+5:30
दोन जणांचे रिपोर्ट 14 दिवसाच्या कालावधीनंतर पुन्हा पॉझिटिव्ह आले

CoronaVirus यवतमाळला आणखी एक कोरोनाग्रस्त सापडला; एकूण रुग्णसंख्या ८१ वर
यवतमाळ : रविवारी दिवसभरात वैद्यकीय महाविद्यालयाला एकूण 39 रिपोर्ट्स प्राप्त झाले. यापैकी दिलासा देणारी बाब म्हणजे 38 रिपोर्ट्स नेगेटिव्ह तर एका जणाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 81 झाली आहे. नव्याने पॉझिटिव्ह आलेली व्यक्ति गत काही दिवसांपासून आयसोलेशन वार्डमध्ये भरती होती.
याव्यतिरिक्त दोन जणांचे रिपोर्ट 14 दिवसाच्या कालावधीनंतर पुन्हा पॉझिटिव्ह आले असले तरी एक्टिव पॉझिटिव्ह संख्या सध्यास्थितित 81 आहे.
दरम्यान, केंद्रीय आरोग्य पथक सोमवार 4 मे रोजी यवतमाळ जिल्ह्यात येत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात ते covid-19 बाबत जिल्हा प्रशासनाकडून आढावा घेणार असल्याचे प्रशासनाने कळविले आहे.