शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : बचत गटाच्या महिलांची तयार केले एक लाखाहून अधिक मास्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2020 17:58 IST

महिला आर्थिक विकास महामंडळाच्या बचत गटातील महिलांनी लाखावर मास्क तयार करण्याचे काम केले आहे. याशिवाय गरजू व गरीब जनतेला जीवनावश्यक वस्तुंचे वाटप व शिवभोजन योजनेंतर्गत भोजन देण्यात आले आहे.

यवतमाळ - कोरोना विषाणू (कोव्हिड - 19) संसर्गाविरुध्दची लढाई प्रत्येकच जण आपापल्या परीने लढत आहे. शासकीय यंत्रणेसोबतच दानशूर व्यक्ती, सामाजिक संघटना आदींचे या लढाईत सहकार्य मिळत आहे. यात बचत गटाच्या महिलासुध्दा मागे नाही. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या बचत गटातील महिलांनी लाखावर मास्क तयार करण्याचे काम केले आहे. याशिवाय गरजू व गरीब जनतेला जीवनावश्यक वस्तुंचे वाटप व शिवभोजन योजनेंतर्गत भोजन देण्यात आले आहे.महिला आर्थिक विकास महामंडळ यवतमाळ जिल्हा कार्यालयद्वारा स्थापित लोक संचालित साधन केन्द्र अंतर्गत महिला बचत गटाचे सक्षमीकरणाचे कार्य करते.  कोरोना विषाणूच्या संकटात या संसर्गापासून वाचण्यासाठी प्रत्येकाने मास्क वापरणे अत्यावश्यक आहे. याच अनुषंगाने महिला आर्थिक विकास महामंडळाच्या बचत गटाद्वारे मास्क तयार करण्यात आले. 10 तालुक्यातील 93 गावातील 188 बचतगटाचे यासाठी सहकार्य मिळाले. या बचत गटाच्या 530 महिलांनी एकूण 1 लक्ष 8 हजार 409 मास्क शिवण्याचे  काम या महिलांनी केले.यात महिलांनी सुरवातीला 5 लक्ष 75 हजार 400 रु गुंतवणूक केली. यातून त्यांनी मास्क तयार करण्याकरीता स्थानिक बाजारपेठेतून सुती कापड खरेदी केले. सदर मास्क तयार झाल्यावर त्यांनी नगर पालिका, बँक, विविध रुग्णालये, ग्राम पंचायत, मेडिकल स्टोर, सामाजिक संस्था आदी ठिकाणी पुरवठा केला. यातून बचत गटाच्या महिलांना निव्वळ नफा 8 लक्ष 53 हजार 253 रु. झाला. याशिवाय 64 महिलांनी 1743 मास्क मोफत शिवून दिले. तसेच गावातील अतिशय गरीब व गरजू, दिव्यांग लोकांना जीवनावश्यक वस्तुंच्या 2469 किट्स वाटप केले. शिवभोजन योजनेअंतर्गत 11262 गरीब लोकांसाठी महिला बचत गटाने भोजनाची व्यवस्था केली.

मास्क विक्रीतून रोजगार : संपूर्ण देशात लॉकडाऊन झाल्यामुळे महिलांनी मास्क शिवून रोजगार मिळविला. तसेच कोरोनाच्या या लढाईत आपले योगदानसुध्दा दिले. दारव्हा तालुक्यातील देऊळगाव येथील रहिवासी ललिता महादेवराव महल्ले म्हणाल्या, आमच्या गावाची लोकसंख्या दीड हजार आहे. सर्वांना मास्क शिवून देण्यासाठी ग्रामपंचायतीने 100 मीटर कापड दिला. यातून 1500 मास्क मी शिवून दिले. ग्रामपंचायतीने प्रति नग सहा रुपये देण्याचे कबूल केले मात्र मी प्रति नग पाच रुपये याप्रमाणे 1500 रुपये कमी घेतले. समाजसेवा केल्याचाही आनंद झाला. मास्क विक्रीतून 7500 रुपये मिळाले, असे त्यांनी सांगितले.लॉकडाऊनच्या काळात कुटुंबाचा गाडा कसा चालवायचा असा प्रश्न उभा राहिल्यावर वणी येथील गोकूळ नगरात राहणा-या प्रियंका राजू काकडे यांनी मास्क शिवणे व त्याची विक्री करणे, हा पर्याय निवडला. सुरवातीला त्यांनी 100 मास्क तयार करून वॉर्डामध्येच विकले. यानंतर नगरसेवकांनी एक हजार मास्कची ऑर्डर दिली. त्यासाठी कॉटनचा कापड खरेदी केला. पाच हजार रुपयांचा कापड व इतर खर्च दीड हजार असा एकूण मला साडेसहा हजार रुपये खर्च आला. तर मास्क विक्रीतून 19500 रुपये मिळाले. म्हणजे निव्वळ नफा 13 हजार रुपये झाला, असे काकडे यांनी सांगितले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसYavatmalयवतमाळ