CoronaVirus News : यवतमाळ जिल्ह्यात 24 जण नव्याने पॉझिटिव्ह; 28 कोरोनामुक्त!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2020 19:28 IST2020-12-12T19:28:17+5:302020-12-12T19:28:43+5:30
CoronaVirus News: गेल्या 24 तासात 28 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 11249 आहे. तर जिल्ह्यात एकूण 379 मृत्यूची नोंद झाली आहे.

CoronaVirus News : यवतमाळ जिल्ह्यात 24 जण नव्याने पॉझिटिव्ह; 28 कोरोनामुक्त!
यवतमाळ: गेल्या 24 तासात जिल्ह्यात 24 जण नव्याने पॉझिटिव्ह आले आहे. तर वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हिड केअर सेंटर आणि कोव्हिड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 28 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार, शनिवारी एकूण 257 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 24 जण नव्याने पॉझिटिव्ह तर 233 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 276 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 11904 झाली आहे. गेल्या 24 तासात 28 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 11249 आहे. तर जिल्ह्यात एकूण 379 मृत्यूची नोंद झाली आहे.
सुरूवातीपासून आतापर्यंत 116696 नमुने पाठविले असून यापैकी 115958 प्राप्त तर 738 अप्राप्त आहेत. तसेच, 104054 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि. प. आरोग्य विभागाने कळविले आहे.