Coronavirus : विदेशवारीहून परतलेल्या 10 जणांवर प्रशासनाची नजर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2020 21:57 IST2020-03-10T21:08:58+5:302020-03-10T21:57:31+5:30
विदेशवारी करून परतलेल्या तीन कुटुंबातील दहा जणांवर जिल्हा व आरोग्य प्रशासनाची सतत नजर आहे.

Coronavirus : विदेशवारीहून परतलेल्या 10 जणांवर प्रशासनाची नजर
यवतमाळ - विदेशवारी करून परतलेल्या तीन कुटुंबातील दहा जणांवर जिल्हा व आरोग्य प्रशासनाची सतत नजर आहे. शासनाने या दहा जणांची यादी जिल्हा प्रशासनाला अलीकडेच सादर केली होती. ते दुबई टूर करून 1 मार्च रोजी यवतमाळ ला परतले. या सर्वांना त्यांच्या राहत्या घरीच ठेवण्यात आले आहे.
तपासणीत कोरोनाची कोणतीही लक्षणे त्यांच्यात आढलली नसली तर प्रशासन त्याच्यावर सतत नजर ठेवून असल्याचे जिल्हाधिकारी एम. देवेन्द्र सिंग यांनी 'लोकमत' ला सांगितले. सदर तीन कुटुंबाचे पत्ते केलापूर, घाटंजी असे असले तरी सध्या ते सर्व यवतमाळ येथेच मुक्कामी आहेत. एका परिवारात 4 तर अन्य दोन परिवारात प्रत्येकी तीन सदस्य आहेत.
दरम्यान आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पुण्यात सापडलेल्या 5 संशयित रुग्णांमध्ये एक यवतमाळचा असल्याचे सांगितल्याने येथील आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली आहे. मात्र या बाबत जिल्हा प्रशासनाकडे कोणतीही माहिती प्राप्त झाली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. सदर व्यक्ती मूळ यवतमाळ चा असावा आणि नोकरीच्या निमित्ताने पुणे येथे वास्तव्याला असावा, अशी श्यक्यताही प्रशासनाने व्यक्त केली आहे.